Share

ठाकरेंच्या वकीलांच्या युक्तीवादामुळे घाम फुटला का? सरन्यायाधीश शिंदेंच्या वकीलांना स्पष्टच बोलले, म्हणाले..

eknath shinde

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बुधावारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं वातावरणही तापलेलं दिसलं. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद इतका जोरात होता की, सरन्यायाधीशांनी सुद्धा शिंदे गटाच्या वकिलांची विचारपूस केली आहे.

निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ठाकरेंना तो निकाल मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातही याचिका दाखल केली आहे. यावर शिंदेंचे वकील मनिंदर सिंग यांनी ठाकरेंची याचिका फेटाळून लावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.

तसेच शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी दमदार युक्तिवाद करत होते.. त्या दोघांचे युक्तिवाद खोडण्याचे काम कपिल सिब्बल करताना दिसून आले. कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ११ वाजता सुरु झाला होता. पण लंच टाईम आल्यावरही त्यांचा युक्तिवाद संपायचा नाव घेत नव्हता. अशातच वकील मनिंदर सिंग संतापल्याचे दिसून आले. त्यावेळी सरन्यायाधीशांनी सुद्धा त्यांची फिरकी घेतली.

मिस्टर मनिंदर सिंग न्यायालयाच्या रुममध्ये गरम होणारे तुम्ही एकटेच नाही. आपण एसी सुरु करुच, पण तुम्हाला वातावरणामुळे गरम होतंय की कपिल सिब्बल यांच्या वादामुळे घाम फुटलाय? असा टोला लगावला. त्यामुळे सर्वत्र न्यायाधीशांच्या या विधानाचीच चर्चा होऊ लागली.

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना व्हिप बजावला होता. बैठकीला बोलावलं होतं. पण एकनाथ शिंदे त्या बैठकीला आले नव्हते. सुनील प्रभू यांनी अधिकृत मेलवरुन २२ जून रोजी व्हिप बजावला होता. पण एकनाथ शिंदे बैठकीलाच आले नव्हते. तसेच बैठकीला का आले नाही? याचे उत्तरही एकनाथ शिंदे यांनी दिले नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

तसेच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.  एकनाथ शिंदेंनी व्हिपला उत्तर देणं गरजेचं होतं. ते बैठकीला उपस्थित नव्हते, तसेच त्यांनी त्यावर काही उत्तरही दिले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.

महत्वाच्या बातम्या-
शिंदेंना ‘ती’ चूक पडणार महागात? सुप्रीम कोर्टात ‘या’ मुद्द्यावर ठाकरे गटाने पकडलं कोंडीत
सुप्रीम कोर्टही शिंदे गटाच्या बाजूनेच देणार निकाल? सरन्यायाधीशांनीच दिले संकेत, म्हणाले..
पृथ्वी शाॅची कारकिर्द धोक्यात; सपना गिल गंभीर आरोप करत म्हणाली, ‘त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now