Share

ज्येष्ठ साहित्यिक एम. जी. भगत आढळले रस्त्यावर भीक मागताना, चौकशी केल्यावर झाला धक्कादायक खुलासा

पंढरपुरमध्ये ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार एम.जी. भगत रस्तावर भीक मागताना आढळून आले आहेत. पंढरपूरातील रॉबिनहुड आर्मीचे सदस्य सुजित दिवाण यांनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. सुजित दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सैनिक शाळेजवळ एक भिकारी व्यक्ती मदतीसाठी याचना करीत असल्याची बाब त्यांच्या कानी पडली.

यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन व्यक्तीची भेट घेण्याचे ठरविले. ज्यावेळी ते तीथे पोहचले तेव्हा भगत यांना पाहून दिवाण यांना धक्का बसला. दिवाण यांनी भगत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी भगत यांनी माहिती दिली की, मी वर्ध्याचा राहणारा आहे. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मी गावाकडून निघालो.

रेल्वेने प्रवास करीत असताना काय घडले माहीत नाही पण माझी बॅग, मोबाईल, पैसे सर्व गायब झाले. माझ्या हाताला पायाला जबरदस्त मार लागला आहे. मला काहीही हालचाल करता येत नाही. माझी शुद्ध सारखी हरपते. एकच कपडे असल्याने माझी अवस्था भिकाऱ्या सारखी झाली आहे.

पुढे भगत यांनी सांगितले, तीन दिवस झाले मी रेल्वे स्टेशनच्या या बाहेरील रस्त्यांवर पडून आहे. लोक भिकारी समजून अन्न पाणी देतात. पण मी कोण हे समजून घेत नाहीत आणि मलाही तितका त्राण नाही. भगत यांनी सांगितलेली सर्व हकीकत ऐकून दिमाण यांना काय करावे समजले नाही.

त्यामुळे त्यांनी लगेच शासकीय रुग्णालयात भगत यांना दाखल केले. भगत यांची मानसिक स्थिती खालावलेली आहे. एक महान साहित्यिक, पत्रकार, संपादक म्हणून भगत यांची ओळख आहे. आज याच भगत यांची झालेली अवस्था पाहून अनेकांच्या काळजाला चटका लागला आहे.

सध्या दिवाण भगत यांची पुर्ण काळजी घेत आहेत. तसेच त्यांच्याविषयी आणखीन तपास करीत आहेत. भगत यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांच्याकडून इतर माहिती मिळवणे कठिण झाले आहे. भगत यांचे अशा स्थितीत आढळणे संशयास्पद आहे. त्याच्या या अवस्थेने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

महत्वाच्या बातम्या
आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव
दारू पिऊन संसदेत आल्याचा झाला होता आरोप, ‘या’ कारणामुळे कुटुंबाने सोडले; वाचा पंजाबच्या भावी
मुख्यमंत्र्यांबद्दल..

नवज्योतसिंग सिद्धूंसारख्या दिग्गज नेत्याला हरवणाऱ्या ‘पॅड वूमन’ जीवन ज्योत कौर कोण आहेत?

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now