‘पाइरेट्स ऑफ द कॅरिबियन’ या हॉलिवूड चित्रपटातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते जॉनी डेप (Johnny Depp) आणि अॅम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यात खटला सुरू आहे, यादरम्यान अॅम्बरने जॉनीवर कोर्टात मारहाण केली आणि शिवीगाळ सारखे अनेक आरोप केले आहेत. त्याचवेळी दोघांच्या या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.(Johnny Depp, Amber Heard, Hollywood)(Johnny Depp’s female fan shouts in court)
दोघांचेही चाहते त्यांच्या न्यायालयीन सुनावणीशी संबंधित प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, कोर्टाच्या खोलीत असे काही घडले की, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्व लोक स्तब्ध झाले. वास्तविक, दोघांच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी दोघांचे चाहते कोर्टाबाहेर आणि कोर्ट रूममध्ये हजर राहतात. दरम्यान, अशाच एका महिला चाहत्याला कोर्टरूममधून बाहेर काढावे लागले.

गोष्ट अशी आहे की या महिला चाहत्याने कोर्टात सुनावणीदरम्यान दावा केला होता की, त्याच्या मुलाचे वडील दुसरे कोणी नसून जॉनी डेप आहेत. सोमवारी पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटावर न्यायालयात सुनावणी सुरू झाली. कोर्टात सकाळची सुटी असताना कोर्टरूममध्ये उपस्थित असलेली एक महिला जोरात ओरडून ‘जॉनी, आय लव्ह यू’ म्हणू लागली. आपले हृदय एकमेकांशी जोडलेले आहेत असेही ती म्हणाली.
यानंतर, जॉनीने वळून या महिलेकडे पाहिले आणि हस्तांदोलन केले. यानंतर महिलेने तिथल्या सर्व लोकांसमोर आरडाओरडा करत जॉनीला सांगितले की ‘हे तुझ मूल आहे’. त्यावेळी न्यायाधीश कोर्टरूममध्ये उपस्थित नसतानाही त्यांना सुरक्षारक्षकांनी हाकलून दिले. त्यावेळी, अॅम्बरही कोर्टात हजर होती आणि एवढा गदारोळ पाहून तिला धक्काच बसला.
काही वेळानंतर कोर्टाबाहेर या महिलेने मीडियाला सांगितले की, ‘ती विनोद करत आहे’. जॉनी आणि अॅम्बरच्या खटल्याची सुनावणी २७ मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की जॉनीला पुन्हा एकदा अॅम्बरच्या वकिलांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल. यापूर्वी अॅम्बर, तिची बहीण आणि जॉनीच्या माजी मैत्रिणीने अभिनेत्यावर धक्कादायक आरोप केले होते.
जॉनी नशेच्या अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, असे अॅम्बरने म्हटले होते. यासोबतच अॅम्बरने आपल्या वक्तव्यात असेही म्हटले होते की, तिनेही जॉनीवर अनेकदा हात उचलला होता. जॉनी डेप आणि अॅम्बर हर्ड यांची २००९ मध्ये भेट झाली होती. दोघांनी एकमेकांना डेट करत २०१५ मध्ये लग्न केले. मात्र, वर्षभरानंतर दोघेही वेगळे राहू लागले आणि २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
महत्वाच्या बातम्या-
आपल्या वेदांची कॉपी आहे एवेंजर्स, कंगना राणावतने हॉलिवूडच्या सुपरहिरोंवर उपस्थित केले प्रश्न
साऊथनंतर आता हॉलिवूडचा धुमाकूळ, Dr. Strange 2 ने पहिल्याच दिवशी कमावले एवढे कोटी
धनुषच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लुक आला समोर, पाहून चाहते म्हणाले, हा अभिमानाचा क्षण
मोठी बातमी! हॉलिवूड अभिनेता विल स्मिथवर दहा वर्षांची बंदी, ऑस्करने घेतला निर्णय