काय सांगता? ‘या’ अभिनेत्रीच्या मिशांवर फिदा झाला होता करण जोहर, केलं होतं तिला प्रपोज

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने आपल्या स्टाईलने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बरसात’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ट्विंकल खन्नाचा शेवटचा चित्रपट ‘लव के लिए कुछ भी करेगा’ हा होता. अक्षय कुमारसोबत लग्न केल्यानंतर ट्विंकल खन्नाने बॉलिवूडला अलविदा केले.(Johar was obsessed with the mustache of this actress)

ट्विंकल खन्नाच्या आयुष्यात असे काही लोक आहेत जे तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचे. बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता करण जोहर देखील या यादीत आहे. जो आपले हृदय अभिनेत्री ट्विंकल खन्नाला देऊन बसला होता. करण जोहरशी संबंधित या गोष्टीचा खुलासा स्वत: ट्विंकल खन्नाने तिच्या पुस्तकाच्या लाँचच्या वेळी केला होता.

Twinkle Khanna is the only woman I ever fell in love with: करण जौहर ने ट्विंकल  खन्ना के साथ काम करने को लेकर कह दी ये बड़ी बात - India TV Hindi

‘मिसेस फनीबोन्स’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात हा खुलासा झाला. ट्विंकलने सांगितले की, करण जोहर माझ्या मिशांवर फिदा झाला होता. याबाबत ट्विंकल खन्ना म्हणाली की, करणने माझ्यासमोर त्याचे मन मोकळे करत मनातली गोष्ट सांगून टाकली होती. त्यावेळी मला हलक्या हलक्या मिशा आल्या होत्या. करण जोहरबद्दल बोलताना ट्विंकल खन्ना पुढे म्हणाली की, करण जोहर नेहमी माझ्या मिशांची प्रशंसा करायचा.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की फक्त ट्विंकल खन्नाच नाही तर करण जोहरने देखील याबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ट्विंकल खन्ना ही एकमेव महिला होती जिच्या तो प्रेमात पडला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की करण जोहर ट्विंकल खन्नाला भेटण्यासाठी त्याच्या बोर्डिंग स्कूलमधून पळून गेला होता. बोर्डिंग स्कूलमधून पळून जाण्याची कल्पना त्याला ट्विंकल खन्नानेच दिली होती.

ट्विंकल खन्नामुळे एकदा करण जोहरचेही हृदय तुटले होते. करण जोहरने ट्विंकल खन्नाला ‘कुछ कुछ होता है’मध्ये ‘टीना’च्या भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु अभिनेत्रीने ही भूमिका करण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर करण जोहर म्हणाला होता की, ट्विंकल खन्नाने माझा डेब्यू चित्रपट करण्यास नकार दिला होता, त्यानंतर माझे मन दुखले होते.

महत्वाच्या बातम्या-
करण जोहर माझ्या मिशांवर झाला होता घायाळ, ट्विंकल खन्नाचा विचित्र खुलासा
VIDEO: करण जोहरने भारती-हर्षच्या मुलाला लॉन्च करण्यास दिला नकार, मग सलमानने घेतला पुढाकार
करण जोहरने ऑन कॅमेरा बड्या अभिनेत्रीचं घेतलं चुंबन; किसिंग व्हिडिओ झाला व्हायरल
अजय देवगण-काजोलची लव्हस्टोरी करण जोहरच्या फिल्मपेक्षा कमी नाही, रोमांच आणि रोमांसने आहे परिपुर्ण