Share

jj hospital : मोठी बातमी! मुंबईत सापडले १३० वर्षे जुने ब्रिटिशकालीन भुयार, २०० मीटर लांबीच्या या भुयारात…

jj hospital

jj hospital 200 meter long tunnel  | मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच देशातील सर्वात जुनी हेरिटेज वास्तूही मुंबईत आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबईत भव्य इमारत बांधण्यात आल्या होत्या. अनेक ब्रिटिश कालीन इमारती मुंबईत आहे. त्यामुळे या वास्तू नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात.

मुंबईतील सर जेजे रुग्णालय हे देखील जुन्या इमारतींपैकी एक आहे. हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सरकारी रुग्णालय देखील आहे. पण अशात मुंबईतील या रुग्णालयातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. जेजे रुग्णालयात खुप जूने भुयार सापडले आहे.

संबंधित भुयार हे ब्रिटिश कालीन आहे. हे भुयार तब्बल १३० वर्षे जुना आणि २०० मीटर लांब आहे. हे भुयार हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ.अरुण राठोड यांना हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत असताना दिसले आहे. त्यानंतर त्यांनी त्याबाबत पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.

अरुण राठोड यांना काही संशयास्पद गोष्टी दिसल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्या नक्की काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तिथे भुयार आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पुढील पाहणी केली आणि तिथे तब्बल २०० मीटर लांबीचे भुयार असल्याचे लक्षात आले. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती मिळत आहे.

हे भुयार जेजे रुग्णालयाच्या २ इमारतींना जोडण्याचे काम करते. सर जेजे रुग्णालयाच्या इमारती १७७ वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या होत्या. या इमारती सर जमशेदजी जीजीभोय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने बांधल्या गेल्या. जमशेदजी जीजीभोय यांनी १६ मार्च १८३८ रोजी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपये दान केले होते.

त्यानंतर ३० मार्च १८४३ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी केली होती. १५ मे १८४५ रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जीजीभोय हॉस्पिटल मेडिकलच्या विद्यार्थी आणि रुग्णांसाठी उघडण्यात आले होते. जेजे रुग्णालय हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक आहे.

महत्वाच्या बातम्या-
Cyrus Mistry : ‘असा’ झाला सायरस मिस्रींचा मृत्यू; ६० दिवसांनी शुद्धीवर आलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगीतला अपघाताचा थरार
AFG Vs AUS : बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नवख्या अफगाणिस्तानने रडवले, राशीदने एकट्याच्या बळावर…
Tabbu : नागार्जूनच्या प्रेमात वेडी झालेली तब्बू त्याच्यासाठी आयुष्यभर बिना लग्नाची राहीलीय

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now