बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र यांचा आज ८० वा वाढदिवस (Jeetendra Birthday) आहे. 7 एप्रिल 1942 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या जितेंद्र यांचे खरे नाव रवी कपूर आहे. जितेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आणि आज त्यांची मुलगी एकता कपूर टीव्हीपासून फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवलेल्या जितेंद्रची सुरुवातीची कहाणी खूपच वेगळी होती. जितेंद्रने पहिली 18 वर्षे मुंबईतील चाळीत घालवली. जितेंद्रचा बॉलिवूडमध्ये कसा प्रवेश झाला, जाणून घेऊया.(Jitendra wants to live in Mumbai, read success story)
अन्नू कपूर यांनी त्यांच्या ‘सुहाना सफर’ शोमध्ये जितेंद्रशी संबंधित हा मजेदार किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की जितेंद्रचे वडील आणि काका चित्रपटांमध्ये दागिने पुरवण्याचे काम करायचे. एके दिवशी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर जितेंद्र यांना घर सांभाळणे कठीण झाले होते. यानंतर जितेंद्र यांनी काहीतरी विचार केला आणि काकांना सांगितले की त्यांना व्ही. शांताराम यांना भेटायचे आहे. मात्र, जितेंद्र यांची स्वप्न तेव्हा धुळीला मिळाली जेव्हा शांताराम म्हणाले, तुला प्रयत्न करायचे असतील तर कर पण मी तुला संधी देणार नाही.
यानंतर त्यांना तेथून फोन आला आणि सांगितले की जेव्हा एकही ज्युनियर कलाकार येणार नाही तेव्हा तुला भूमिका दिली जाणार. अभिनयाची संधी मिळो वा न मिळो पण त्यांना राजकमल स्टुडिओच्या सेटवर रोज यावे लागे. त्याचा त्यांना महिन्याला 105 रुपये पगार मिळत होता. तेथूनच त्यांच्या करीयरची सुरुवात झाली.
व्ही.शांताराम यांनी त्यांना फटकारले असले तरी काम सुरू असताना जितेंद्र असे काही तरी करायचे की सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या जायच्या. जेव्हा व्ही. शांताराम यांनी त्यांचा पुढचा चित्रपट सुरू केला तेव्हा जितेंद्रला स्क्रीन टेस्ट देण्यास सांगण्यात आले. मात्र, जेव्हा त्यांना बोलावण्यात आले तेव्हा ते ‘सेहरा’ चित्रपटाचा डायलॉगही नीट बोलू शकत नव्हते. मात्र, असे असतानाही त्यांना स्क्रीन टेस्टची ऑफर मिळाली.
मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांची स्क्रीन टेस्ट पास केली आणि ‘गीत गाया पत्थरों ने’ हा चित्रपट करण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. यानंतर व्ही. शताराम यांनी त्यांचे नाव बदलले आणि त्यानंतर त्यांना रवी कपूर नव्हे तर जितेंद्र म्हटले जाऊ लागले. हळूहळू त्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ते सहाय्यक भूमिका करत होते तेव्हा त्यांना महिन्याला 150 रुपये मिळत असे, पण जेव्हा त्यांची हिरो म्हणून निवड झाली तेव्हा त्यांचे पैसे कमी झाले. त्यांना 6 महिने पैसे मिळाले नाहीत. त्यांचा पगार 150 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आला. त्यांना ब्रेक दिला जात असल्याने तेवढाच पगार मिळेल असे सांगण्यात आले आणि त्यांनी त्यासाठी होकार दिला.
महत्वाच्या बातम्या-
शूटींगच्या लंचब्रेकमध्येच देवानंदने केले होते लग्न; खूपच रोमॅंटीक आहे बॉलीवूडच्या एव्हरग्रीन हिरोची लव्हस्टोरी
हायकोर्टाच्या महत्वपूर्ण आदेशानंतर एसटी संपाचा तिढा अखेर सुटला, कर्मचाऱ्यांचा तुफान जल्लोष
राजामौलींच्या RRR समोर ATTACK चा निघाला घाम, स्वत: जॉनने केलं कबूल, म्हणाला, आम्हाला जे हवे होते..
रेखासोबत केला टाईमपास, हेमासोबत मंदिरात लग्न करायला गेले पण.., जितेंद्र यांची लव्ह लाईफ वाचून अवाक व्हाल