राज्यात भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार मधील बरेच नेते हे त्यांच्या आक्रमक विधानांनी चांगलेच चर्चेत असतात. त्यामधील एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड. आव्हाड हे महाविकास आघडी सरकारमधील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.
अनेकदा ते विरोधकांवर तिखट शब्दात हल्लाबोल चढवतात. एवढच नाहीतर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर देखील आव्हाड हे स्पष्टपणे आपली मत मांडतात. कित्येकदा आव्हाड हे या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. परंतु, त्यांनी आपला स्पष्ट व्यक्तेपणा सोडलेला नाहीये.
आता पुन्हा एकदा आव्हाड यांनी मुलांच्या जातीवरील ट्विट केले आहे. सध्या राजकीय वर्तुळात आव्हाड यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा सुरू आहे. आव्हाड यांच्या या ट्विट अजूनही कोणत्याच राजकीय पक्षामधील नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये. ट्विटची सध्या सर्वत्र चांगलीच चर्चा आहे.
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आई-वडील यांची जात वेगळी असताना पाल्यांनी कोणती जात स्विकारावी या मुद्द्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यचबरोबर मुलांना बापाची जात बंधनकारक का? असा स्पष्ट सवाल उपस्थित केला आहे.
आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “जात लावताना ती बापाची लावली जाते. बापाची जात बंधनकारक का? आई हा महत्वाचा घटक आहे, मग तिची जात का लावता येऊ नये? कुठली जात लावावी, आईची की बापाची हे ठरवताना पाल्यांना स्वातंत्र्य द्यावे, असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.
जात लावताना ती बापाची लावली जाते
बापाची जात बंधनकारक का?
आई हा महत्वाचा घटक मग तिची जात का लावता येऊ नये…
जात लावताना पाल्याला स्वातंत्र्य द्यावे कुठली जात लावावी आईची कि बापाची— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 28, 2022
दरम्यान, गुरुवारी राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
मात्र, या निर्णयाला भाजपाकडून प्रचंड विरोध करण्यात येत आहे. यावर बोलताना आव्हाड यांनी भाजपाला मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून देत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “मालक तुमच्या शिवराजसिंह यांच्या सरकारने देखील काही दिवसापूर्वी मध्यप्रदेशमध्ये असांच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला का बदनाम करता आहात. ‘तुम करे तो रास लीला, हम करे तो चरित्र ढीला’.”
महत्त्वाच्या बातम्या
“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”
महिन्याला १.७५ लाख कमावणाऱ्या युवा शेतकऱ्याने सांगितले गुपित, तरुणांना दिली शेती करण्याची प्रेरणा
“शरद पवारांनी खूप सोसलं आहे त्यामुळे तरुण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका ते कधीही घेणार नाहीत”
Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनच्या भांडणात चीनने खेळली मोठी खेळी, भारताची वाढली चिंता