Share

काँग्रेस आमदार सरकारला म्हणाला, मला नको तुमचं घर; जितेंद्र आव्हाडांनी दिले सणसणीत उत्तर, म्हणाले..

jitendra awhad

गुरुवारी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ३०० आमदारांना मुंबई घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

विरोधकांनी नेहमी प्रमाणे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले. तर दुसरीकडे या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्येच खटके उडल्याचे समोर आले आहे. ठाकरे सरकारमधील कॉंग्रेस नेत्यांनी या घोषणेवर नाराजी व्यक्त करत घर घेण्यास नकार दिला आहे. यामुळे आता वातावरण आणखीच तापल आहे.

जवळपास ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. परंतु काही जणांनी याचा विरोध केला. मनसेच्या राजू पाटील यांच्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदेंनीही घर नाकारालं आहे.

अशातच काँग्रेसच्या आमदाराने ट्विट करुन घर नाकारलं. ‘महाराष्ट्र सरकारकडून देणाऱ्या येणाऱ्या मुंबईतील घराची मला गरज नसल्याचं म्हटलं. तसेच, वांद्रे इस्टमध्ये हजारो नागरिकांना घरं नाहीत, ते कठीण परिस्थितीत राहतात, अशा लोकांसाठी हा पैसा खर्च करावा, असे काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकी यांनी म्हंटले आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1507722042317033472?s=20&t=b_RIlIimZcWkivRJfi0ohA

सिद्दिकी यांच्या ट्विट नंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. ”तुमच्याकडे 10 घरं आहेत, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. आणि ही योजना फक्त महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील आमदारांसाठी असून मुंबईकरांना नाही. तसेच, ही घरे मोफत मिळणार नाहीत हेही तुम्हाला माहिती असेल, आशा आहे आता तुम्हाला समजलं असेलच,” असे आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दरम्यान गदारोळ होऊ लागल्यानंतर आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.आमदारांमध्येच घरे घेण्यावरून दुमत असल्याने अखेर राज्य सरकारने घरांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देण्यात येणार नसल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

ट्विट करत याबाबत आव्हाड म्हणाले, “आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिलं.

महत्त्वाच्या बातम्या
सुनील गावसकर यांनी पुन्हा केली भविष्यवाणी, म्हणाले, ‘हा’ खेळाडू करणार ९०० हून अधिक धावा
नितीन गडकरी यांची पुण्यासाठी मोठी घोषणा; प्रवास होणार सुसाट, गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन
IPL मधून BCCI ला किती कमाई होते? प्रत्येक संघाला किती पैसा मिळतो? वाचा संपूर्ण गणित
सचिनची मुलगी सारा तेंडूलकर ‘या’ विवाहीत अभिनेत्याच्या प्रेमात झालीय पागल; स्वत:च दिली कबुली

इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now