Share

“इतक खोटं करायचं कि ते उघडं नागडं होऊन समोर येतं, याचा अर्थ किरण माने चुकलेले नाही”

jitendra avhad

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेतून अभिनेते किरण माने (kiran mane) यांना तडकाफडकी काढण्यात आल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याबद्दल आपल्याला काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केला आहे. तर, गैरवर्तनामुळं मानेंवर कारवाई करण्यात आल्याचं निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. (jitendra awhad slams star pravah)

याच प्रकरणावरुण राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad )यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन हल्लाबोल करत स्टार प्रवाह वाहिनीवर टीका केली आहे. यापूर्वीही आव्हाड यांनी या प्रकरणामध्ये किरण मानेंची बाजू घेतली होती. यावेळेस त्यांनी वाहिनीने पाठवलेलं पत्र पोस्ट करत पत्राची तारीख आणि पत्र पोस्ट केल्याच्या तारखेतील तफावत दाखवत ट्विट केलं आहे.

 

आव्हाड यांनी वाहिनीने पाठवलेलं पत्राचा फोटो पोस्ट करत या पत्रावरुन किरण माने चुकलेला नाही असं म्हटलंय. किरण मानेला प्रोडक्शन हाऊस ने कुठल्याही प्रकारचे लेखी समजपत्र असे काहीही दिलेले नव्हते. हे मी स्टार प्रवाहला बोलून दाखवल्यानंतर आज किरण मानेला एक पत्र रजिस्टर पोस्टाने आलं. त्याच्यावरती रजिस्टर पोस्ट केल्याची तारीख २१ आहे आणि पत्र लिहिण्याची तारीख १३ आहे. इतक खोटं करायचं कि ते उघड नागड होऊन समोर येत. म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही,’ असे आव्हाड यांनी म्हणलं आहे.

दरम्यान, याचाच धागा पकडत शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांनी अभिनेते किरण माने यांनी राजकारणात प्रवेश करावा असं म्हटलं आहे. “मत मांडण्यासाठी त्यांना कामावरून काढून टाकणे आणि त्यांच्याबद्दल अफवा पसरवणे पूर्णपणे चुकीचे आहे. किरण माने हे उत्तम वक्ता आहेत. त्यांना मुद्दे मांडण्याची कला येत, त्यामुळे त्यांनी राजकारणात यावे असे मला वाटते,” असंही त्यांनी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “या वादाच्या आधी किरण माने कोण आहेत, कोणत्या मालिकेत काम करतात, हेही मला माहीत नव्हते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, हे ही मला माहीत नव्हते. त्यावेळी मी पाठिंबा दिला होता पण नंतर अशा गोष्टी सुरू झाल्या की ज्यामध्ये त्यांनी, मालिकेच्या मंचावर चांगले काम न करणे, महिलांशी त्याची वागणूक चांगली नव्हती यासारख्या आरोपांचा समावेश होता.’

‘कोणतीही व्यक्ती कोणतेही विधान जारी करू शकतो, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत आपलं मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे,” असं दीपाली भोसले सय्यद म्हणाल्या. याच संदर्भात रोकठोक मत व्यक्त करताना दीपाली भोसले सय्यद यांनी मानेंना राजकारणात प्रवेश करण्याचा सल्ला दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या
फडणवीस विरुद्ध ठाकरे: हिंदुत्व, मोदी अन् भाजपा-सेना युतीवरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं
ज्या मातांना सरोगसीने रेडीमेड मुलं मिळतात त्या मातांना.., प्रियंका चोप्रा आई झाल्यानंतर लेखिकेचा सवाल
मनसे स्टाईल राष्ट्रवादीत चालणार नाही; रुपाली पाटलांना थेट अजितदादांनीच दिले शिस्तीचे धडे
भयानक! वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना महिलेचा मृत्यु, कारण वाचून धक्का बसेल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now