Share

jitendra awhad : फाशी दिली तरी चालेल, पण मी जे केलं….; अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक प्रतिक्रिया

jitendra avhad

jitendra awhad on case file  | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव या चित्रटाच्या वादामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

हर हर महादेवचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनासोबत घेऊन हा शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अटक केली आहे. तसेच त्यांनी एक फेसबूक पोस्टही केली आहे. ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

फेसबूक पोस्ट-
आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाणही यावेळी आक्रमक झाल्या. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं आहे. त्यामुळे धाकदपट कसा करायचा हे सध्या सुरु आहे. ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना केली जात नाहीये. ज्यांचा गुन्हा नाही त्यांना अटक करणं चुकीचं आहे, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sachin Tendulkar : पराभव-विजय हे आपल्याच हातात असतात; भारताच्या पराभवानंतर सचिनने केले हैराण करणारे ट्विट
Rohit Sharma : सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सोडू शकतो कर्णधारपद
पराभवासाठी रोहीत शर्माच जबाबदार; सेहवाग आणि जडेजाने जाहीरच दाखवल्या ‘या’ चूका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now