महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अगदी राज्यकर्त्यांपासून ते थेट जेष्ठ अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांना ते धारेवर धरतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे, नुकतीच आव्हाड यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली आहे.
आता लवकरच बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा अक्षय कुमारचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. याचबरोबर या सिनेमात अक्षय कुमार पृ्थ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना आव्हाड यांनी तिखट शब्दात अक्षय कुमारवर हल्लाबोल चढवला आहे. इतकंच नाही तर आव्हाडांनी अक्षय कुमारचा उल्लेख मुर्ख माणूस असाही केला आहे. आव्हाड याबद्दल माध्यमांशी बोलत होते. ‘अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमावतो,’ असंही त्यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, ‘पृथ्वीराज चौहान सगळ्यांना माहितीये. आणि तुम्हाला माहिती नसेल तर गुगल करा. 26 वर्षीय पृथ्वीराज चौहान घोड्यावर बसला, अक्षय कुमार 50 चा आहे,’ अशी जहरी टिका आव्हाड यांनी अक्षय कुमारवर केली आहे. यामुळे आता अक्षयचा नवीन चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देखील आव्हाड यांनी टार्गेट केले आहे. ‘जेम्स लेनने जे बोललं आहे, ती माहिती पुरंदरेंनीच पुस्तकात लिहून ठेवलीय. जमिनी वाचवण्यासाठी मराठे आईला पाठवायचे हे पुरंदरेंनी लिहिलं आहे. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम वाद याच शिवचरित्रानं केला, असे स्पष्टच आव्हाड बोलले.
याचबरोबर पुढे आव्हाड म्हणाले, ‘आता लोकशाही आहे. सगळे राजे बिजे आता घरी गेलेत. तसेच तुकोबारायांचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. तुकोबारायांची गाथा बुडवली नव्हती, तर ती गायब केली होती, जाळली होती,’ असा मोठा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अभिनय नाही तर ‘ह्या’ क्षेत्रात मास्टर आहे अशोक सराफ यांचा एकूलता एक मुलगा; वाचा त्याच्याबद्दल
भाजपचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
९ रुपयांच्या ‘या’ मल्टीबॅगर शेअरने दिला तब्बल ३६४० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल
अशोक सराफ शर्टाचे पहिले बटन नेहमी उघडे का ठेवायचे? कारण ऐकून चकीत व्हाल