‘माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? तो भाग कोणता आहे हे महाराष्ट्र ओळखतो, असं जोरदार प्रत्युत्तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. आव्हाड हे जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमाला आले होते.
यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. यावेळी ‘महाराष्ट्रात स्टॅण्ड अप कॉमेडियीनच्या जागा खूप खाली आहेत त्या राज ठाकरे यांनी घ्यावा, असा खोचक सल्ला जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
काल भाषणात जयंत पाटील यांना जंत पाटील तर आव्हाडांना थेट नागांची उपमाच देऊन राज ठाकरे बरसले. ‘काय पण घ्याल, नागाने फना काढावा ना असा, उद्या परत काही तरी बोलेले, डसतो वगैरे, ये शेपटी पकडून फेकून देतो, वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल म्हणाले, आता तिथे वस्तारा कसा सापडणार, दाढी कुणी करतच नाही, मग वस्तारा कसा सापडणार, आव्हाडांच्या बुद्धीची कीव येते,’ असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, ‘त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे की माझं तोडं काहीतरी नागाच्या फण्यासारखं दिसतं, अशा वैयक्तिक कोट्या तर कोणालाही करता येतात, ते मिमिक्री आर्टिस्टचं काम आहे, पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आदर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही.’
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असं जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का? असा सवाल आव्हाड यांनी केला. सोबतच तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो, असं म्हणत आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
पण देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही.
आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे. या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा!
जश्यास तसे हि संत तुकारामाची शिकवण …
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 12, 2022
दरम्यान, आव्हाड यांनी ट्विट देखील केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘देशाच्या चित्रपट सृष्टीला जे जॉनी लिवर देऊ शकला ते कोणीच नंतर देऊ शकलं नाही, आज महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर एक नवीन जॉनी लिवर जन्माला आला आहे, या नवीन जॉनी लिवरला खूप खूप शुभेच्छा, असं खोचक ट्विट करत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“वारसा प्रबोधनकारांचा पण विचारसरणी मात्र नथुराम गोडसेची” जयंत पाटलांचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
‘दिवा विझताना मोठा होता, हे आज पुन्हा दिसलं’, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
सदावर्तेंनी कोट्यवधी रुपये जमा केल्याच्या प्रकरणात खोत-पडळकरांचीही चौकशी होणार?
‘या’ खेळाडूने राजस्थानला दिला धोका, नेट प्रॅक्टीस करताना घेतला संन्यास, चाहते झाले हैराण