प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. पण आजही त्या सगळ्यांच्या मनात आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या नावाने पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा’ सोहळा पार पडला आहे. (jitedra awhad on lata dinanath mangeshkar award)
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणार पुरस्कार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एका मंचावर दिसतील, असे म्हटले जात होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित नव्हते. यावेळी मोदींसोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लता मंगेशकरांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते.
अशात मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित नसल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. पण आता एक हैराण करणारी बाब समोर आली आहे. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नाव टाकण्यात आले नव्हते, पण मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
आता भेट घेऊन आमंत्रण दिलं पण निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्यामुळे राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हड यांनी मंगेशकर कुटुंबाच्या या गोष्टीवर निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करुन हा निषेध व्यक्त केला आहे.
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आता इतका मोठा सोहळा असतानाही मुख्यमंत्र्यांचे या निमंत्रण पत्रिकेत नाव का नव्हते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“हनुमान चालीसा वाचून जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी”
नितेश राणेंनी सोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवावं; शिवसेनेने दिले आव्हान
इलेक्ट्रीक बाईक घेणारांनो सावधान! चार्जींगला लावलेल्या बॅटरीचा स्फोट झाल्याने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त