Jhulan Goswami, brilliant career, records, cricket/ भारताची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने आपल्या 20 वर्षांच्या शानदार कारकिर्दीला निरोप दिला आहे. आता ती भारताकडून खेळताना दिसणार नाही. पण झूलनने आपल्या करिअरमध्ये ज्या प्रकारे यशाची शिडी चढली आणि अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले, ते लोकं विसरू शकणार नाहीत. बंगालमधील एका छोट्या शहरातून आलेल्या, झुलनचा प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
काहींसाठी ‘बाबुल’, काहींसाठी ‘चकदहा एक्स्प्रेस’, काहींसाठी ‘बॉल गर्ल’ असणारी झुलन चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 25 नोव्हेंबर 1982 रोजी पश्चिम बंगालमधील चकदहा येथे जन्मलेल्या झुलनचे प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान आहे. झुलन सध्या महिला क्रिकेटची अनुभवी खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्यासारखे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, तिचा हा प्रवास खडतर संघर्षाने भरलेला आहे.
एकेकाळी मुलांनी झुलनला मैदानावर क्रिकेट खेळू दिले नाही. घरापासून क्रिकेट स्टेडियमचे अंतरही इतके होते की तिथे पोहोचणे कठीण होते. पण, क्रिकेटच्या आवडीमुळे झुलनने सर्व अडथळे पार केले. 80 किलोमीटरचे अंतर कापून सरावासाठी जाणे असो किंवा मुलगा-मुलगी असा भेद करणाऱ्या समाजाशी लढणे असेल. झुलनने आपल्या प्रतिभेने चोख प्रत्युत्तर दिले आणि क्रिकेटचे मोठे नाव बनले.
पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील चकदाहा गावात जन्मलेल्या झुलनचे पूर्ण नाव झुवन निशित गोस्वामी आहे. तिच्या वडिलांचे नाव निशित गोस्वामी आणि आईचे नाव झरना गोस्वामी आहे. झुलनने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती. सुरुवातीला झुलन खूप हळू गोलंदाजी करायची. त्यामुळे मुलं तिची थट्टा तर करायचीच पण तिला खेळण्यापासूनही रोखायची.
वेगवान गोलंदाजी फक्त मुलींची नाही असे मुलांना वाटायचे. तथापि, झुलन कधीही निराश झाली नाही आणि तिच्या गावापासून सुमारे 80 किमी अंतर कापून नियमितपणे सरावासाठी जात राहिली. लवकरच तिला मेहनतीचे फळ मिळाले आणि 2002 हे वर्ष तिच्यासाठी आनंद घेऊन आले. वयाच्या 19 व्या वर्षी तिला भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळायला मिळाला. पुढे 2006 मध्ये टीम इंडियाच्या T20 संघात तिचा समावेश करण्यात आला.
आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने भारतासाठी आतापर्यंत 192 एकदिवसीय सामन्यांमध्ये 240 विकेट्स, 68 टी-20 सामन्यांमध्ये 56 बळी आणि 12 कसोटी सामन्यांमध्ये 44 बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 पेक्षा जास्त षटके टाकणारी ती जगातील पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. आयसीसी वनडे क्रमवारीतही झुलन दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटसाठी झुलनला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
प्रमाणापेक्षा छोटी मोमोकिनी घालून अनुष्का सायकलवर करत होती ‘हे’ चाळे, विराटने काढला व्हिडीओ
Netflix: सुहाना खानपासून ते इरफानच्या मुलापर्यंत हे कलाकार सज्ज, नेटफ्लिक्सची एकाच दिवसात ८ प्रोजेक्ट्सची घोषणा