तारक मेहता का उल्टा चष्माचे जेठालाल उर्फ ’दिलीप जोशी’ यांनी त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा केला आहे. दिलीप जोशी यांना आज सर्वजण जेठालाल या नावाने ओळखतात. या भूमिकेने त्यांना नाव, प्रसिद्धी आणि सर्व काही दिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, दिलीप यांनी सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यांच्यासोबतही काम केले आहे.(jethalals-work-with-salman-khan-was-seen-in-yaa-movie)
दिलीप जोशी सुरुवातीपासूनच तारक मेहता का उल्टा चष्मा(Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या शोशी जोडले गेले आहेत. मात्र त्यापूर्वी या अभिनेत्याने अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले आहे. दिलीप यांनी सलमान खानसोबत मैंने प्यार किया या चित्रपटात काम केले होते. त्यात दिलीप अभिनेत्याच्या घरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता.
दिलीप जोशी सलमान खानच्या(Salman Khan) ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात भोला प्रसादच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1994 मध्ये आला होता आणि त्यात माधुरी दीक्षितने सलमान खान सोबत भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. याशिवाय त्यांनी अक्षय कुमारच्या खिलाडी 420 या चित्रपटातही काम केले होते.
दिलीप जोशी(Dilip Joshi) यांनी शाहरुख खानसोबत त्यांच्या वन २ का 4 या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात किंग खानसोबत जुही चावला मुख्य भूमिकेत होती. चित्रपटांमधील छोट्या भूमिकांमुळे त्यांना जेवढी लोकप्रियता मिळाली नाही, तेवढी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये मिळाली आहे. आज त्यांचे टीव्ही इंडस्ट्रीत एक प्रसिद्ध नाव आहे.
दिलीप जोशी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला असून त्यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी नियती जोशी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. लग्नाचे फोटो अभिनेत्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्याने लग्नाच्या विधी दरम्यान जोरदार डान्सही केला आहे.