Share

बबिताजींच्या ‘त्या’ कृतीनंतर सेटवरच भडकले होते जेठालाल, म्हणाले, तुमच्या वागणुकीमूळे..

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta ka ulta chashma) अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या छोट्या पडद्यावरील शोमध्ये समाविष्ट आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या शोची कथा संपूर्ण गोकुळधाम सोसायटीभोवती फिरते. पण लोकांना जेठालाल अर्थात दिलीप जोशी आणि बबिता जी अर्थात मुनमुन दत्ता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना सर्वाधिक आवडते. विवाहित जेठालाल आपल्या शेजारणीला थांबवतो आणि नंतर तिच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो तो क्षण प्रेक्षकांना गुदगुल्या करतो.(‘Tarak Mehta Ka Ulta Chashma’, Babita, Moonmoon Datta, Dilip Joshi, Birthday)

मात्र खऱ्या आयुष्यात दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांचे नाते कसे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? दिलीप जोशी यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त मुनमुन दत्तासोबतचे त्यांचे बॉन्डिंग कसे आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि ही मैत्री ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या आधीपासून जवळपास ४ वर्षांपूर्वीची आहे.

दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांनी २००४ च्या सिटकॉम ‘हम सब बाराती’मध्ये पहिल्यांदा काम केले होते. या मालिकेत दिलीप जोशी नाथू मेहताच्या भूमिकेत होते आणि मुनमुनने मिठीची भूमिका साकारली होती. मुनमुन दत्ताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिताचे पात्र साकारण्याचे श्रेय दिलीप जोशी यांना जाते हे फार कमी लोकांना माहीत असेल.

एका मुलाखतीत दिलीपने सांगितले होते की, जेव्हा त्याला शोमध्ये जेठालालच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते, तेव्हा त्याने इतर कलाकारांनाही कास्ट करण्यात मदत केली होती. यामध्ये मुनमुन दत्ताचाही समावेश आहे. दिलीप जोशी यांच्या सल्ल्यानंतरच निर्मात्यांनी मुनमुनला बबिताच्या भूमिकेत कास्ट केले. मात्र, दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्यातील बिघडलेल्या नात्याच्या बातम्याही मीडियामध्ये व्हायरल झाल्या होत्या.

मुनमुनने दिलीपच्या मित्रांची मागणी पूर्ण न करणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले.  खरंतर, २०१७ मध्ये एका एपिसोडच्या शूटिंगदरम्यान दिलीप जोशी यांचे काही मित्र आले होते, जे आयकर विभागात काम करतात. त्यांनी मुनमुनसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती, ती अभिनेत्रीने नाकारली होती.

दिलीप जोशींना मुनमुन दत्ताच्या वागण्याचं इतकं वाईट वाटलं होतं की, त्यांनी तिला खडसावले होते. त्यांनी मुनमुनला सांगितले होते की, तिच्या वागण्यामुळे शोच्या इतर कलाकारांबद्दल चुकीचा संदेश जाईल. या घटनेनंतर दिलीप आणि मुनमुनच्या नात्यात काही प्रमाणात कटुता आली. मात्र या वैयक्तिक आयुष्यातील मुद्द्याचा परिणाम त्यांनी पडद्यावर पडू दिला नाही.

महत्वाच्या बातम्या
६ जण शुन्यावर बाद झाले पण.., १४५ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही की वाचून थक्क व्हाल
खाण्यापिण्याचे, पैशांचे आमिष दाखवून करायचे धर्मपरिवर्तन, पोलिसांनी धर्मगुरूंच्या आवळल्या मुसक्या
शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..
घरे मिळत नव्हती तेव्हा घरे द्या, मग कमी किंमतीत द्या, किंमत कमी केली तर अर्ध्या किंमतीत द्या, आता अजून…..
 

मनोरंजन ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now