सर्वत्र अलीकडेच आलिशान लग्नाचा ट्रेड सुरू झाला आहे. प्री वेडिंग शूट केले जाते. मग लग्नाच्या दहा दिवस अगोदर प्री वेडिंग शूटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. तसेच हेलिकॉप्टर मधून वधू- वरांची लग्नामध्ये इंट्री होते. इतकेच नाही तर नवरी बुलेट चालवून लग्न मंडपात इंट्री मारते. (jcb machine reached pick up bride)
मात्र आज आम्ही तुम्हाला अशा लग्नाची गोष्ट सांगणार आहोत. तुम्हाला नक्कीच वाटेल आपणही पुन्हा असे भन्नाट लग्न करावे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमधील सिरमौरमधील लग्न सोहळ्याची ही गोष्ट आहे. एका तरुणाने थेट JCB वरून वरात आणल्याची घटना आता समोर आली आहे.
त्याच झालं असं, रस्त्यावर मोठा प्रमाणात बर्फ साचलेला होता. जवळपास तीन फुटांपर्यंत बर्फ होता. संगहाडहून रतवा गावासाठी वरात निघाली होती. त्याच वेळी बर्फवृष्टी सुरू झाली. त्यामुळे वरातीला लग्नाच्या स्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. कोणताच पर्याय नसल्याने त्यामुळे नवरदेवाचे वडील जगत सिंहने पुढे जाण्यासाठी जेसीबी मशीनची सोय केली.
गिरीपार भागातील गत्ताधार गावात पाऊस आणि हिमवर्षावामुळे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे कार घेऊन रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे होते. त्यामुळे नवरदेवाच्या वडिलांनी जेसीबीची व्यवस्था केली. मुहूर्ताची वेळही निघून गेली होती. मात्र बर्फमुळे कुटुंबीयांसमोर काहीच दुसरा पर्याय नव्हता. शेवटी वऱ्हाडी मंडळी अशा प्रकारे नवरीच्या घरी पोहोचले.
तसेच येथे लग्नाच्या सर्व विधी केल्या आणि नवरीला जेसीबीमध्ये घेऊन परतले. नवरदेव विजय प्रकाश, भाऊ सुरेंद्र, वडील जगत सिंह, फोटोग्राफर यांना बसवून जेसीबीने तब्बल 30 किमीपर्यंत प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या याच लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अपूर्वा पुन्हा झळकणार ‘या’ मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका
किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांची खुर्ची धोक्यात? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश
राष्ट्रवादीने पाडले काँग्रेसला मोठे भगदाड, महापौरांसह सर्व २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लेक चालली सासरला! अलका कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, पहा खास फोटो