पवार यांच्या नेपियन्सी रोड येथील सिल्वर ओक या निवासस्थानी शंभराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. गावदेवी पोलिस ठाण्यात या आंदोलकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ आरोपींना अटक करण्यात आली.
तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबतच त्यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनाही पोलिसांनी सह आरोपी केले आहे. दरम्यान सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसुन त्यांचा मोबाईलही बंद आहे.
आता पोलिस अॅड. जयश्री पाटील यांचा शोध घेत आहेत. ९ रोजी गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर केल्यापासून जयश्री पाटील यांनी पोलिसांचे संरक्षण सोडले आहे. गुणरत्न सदावर्तेना कोर्टात हजर केल्यावर त्या उपस्थित होत्या मात्र तेव्हा त्या पोलिस संरक्षणाशिवाय आल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत बोलताना अॅड. जयश्री पाटील म्हणतात, ‘आम्ही शरद पवार , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कारवाई केल्यामुळे केवळ सूद भावनेतून आम्हाला या प्रकरणात टार्गेट केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे याबाबत पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा कट गुणवंत सदावर्ते राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आंदोलनाच्या आदल्या दिवशी शिजला. पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्याचा सल्ला गुणवर्तेंच्या पत्नी जयश्री यांनी दिला असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती मिळत आहे.