सध्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा ही गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे.
आता या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून या ठिकाणी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या प्रमुख करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि ठाकरे सरकार पुन्हा आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या 50 हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडूण येतील, असा दावा आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आला आहे.
यामुळे ही निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेला आघाडीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होते. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील, सतेज पाटील तसेच राजेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना थोरात म्हणाले, ‘ही सभा पाहिल्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्रीताई निवडून येतील याची खात्री झाली, असे थोरात म्हणाले. जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणींना अभिवादन आहे हे लक्षात घ्या, असे आवाहनही थोरात यांनी केलं आहे.
तसेच जयंत पाटील यांनी येथे बोलताना चंद्रकांत जाधवांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील म्हणाले, ‘अण्णा जातील आणि आपल्यावर हा प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं. स्वतःच्या विजयाची मिरवणूक सुरू असताना गॅसचा स्फोट झाल्यानंतर आण्णा लगेच धावून गेले, अशी आठवण पाटील यांनी सांगितली.
दरम्यान, ‘जयश्रीताई जाधव यांना किमान 50 हजार मतांनी निवडून द्यायचे आहे. कोल्हापुरात नमो नमो चालणार नाही,’ असे राजेश क्षीरसागर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी भाजपला लक्ष केले. ते म्हणाले, ‘मातोश्रीवरून आलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी अंतिम असतो. शिवसैनिक कधीही आदेश धुडकावत नाही. 2019 साली कोल्हापुरात भाजपनं शिवसेनेबरोबर गद्दारी केली.’
महत्त्वाच्या बातम्या
समाजाची दिशाभूल करण्यासाठी कला क्षेत्राचा वापर, कोल्हेंची काश्मीर फाइल्सवर टीका
लग्नानंतर सकारात्मक उर्जा घरात घेऊन आली वहिनी, कतरिनाच्या दिराने केले तोंडभरून कौतुक
पत्नी आणि सासूच्या विचित्र मागण्यांमुळे खचला; अखेर तरुणाने उचललं भयावह पाऊल, सुसाईड नोट वाचून हादराल
महिलांवर होणारा अन्याय नाही बघवला, दोन मुलांची आई बनली PSI; औरंगाबादच्या रेणूकाची यशोगाथा वाचून व्हाल थक्क