Share

पुण्यातील ‘या’ कुख्यात गॅंगस्टरच्या पत्नीने केला राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

ncp

आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होऊ लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच मनसेला जबर धक्का बसला आहे. आज माजी नगरसेविका व गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. (jayashree gajanan marane joins ncp)

गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. आता महापालिका निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहीले असताना जयश्री मारणे यांनी पक्षप्रवेश केल्याने हा पक्षप्रवेश सध्या चर्चेचं कारण ठरला आहे. जयश्री मारणे याआधी कोथरूड मध्ये मनसेच्या नगरसेविका होत्या.

जयश्री मारणे या पुण्यातील गुंड गजानन मारणेच्या पत्नी असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी असा दावा केला होता की, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १५ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीतील तब्बल १५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

येत्या १४ मार्चला पुणे महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. जगताप यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, खुनाच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून गजानन मारणेची सोमवारी (15 फेब्रुवारी) सुटका करण्यात आली. यावेळी मारणेच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर त्याचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर तळोजा ते पुणे अशी मारणेची मिरवणूक काढण्यात आली.

गजा मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर मोठी रॅली काढली होती. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच दरम्यान विविध कलमा अंतर्गत गजानन मारणेवर गुन्हे दाखल करून, त्याला अटक देखील करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! मारूती सुझूकीची भन्नाट ऑफर, होळीच्या आधी ५० हजाराला मिळत आहे Alto
छाती ठोकून शब्द दिला; दंड, मांड्या थोपटत आश्वासन पूर्ण केलं; अमोल कोल्हेंची पोस्ट तुफान व्हायरल
व्हॅलेंटाईनच्या दिवशीचा खासदाराचा बेडवरचा व्हिडिओ व्हायरल; १८ वर्षाच्या पत्नीसोबत करत होता मस्ती
आयपीएल ऑक्शन बघता बघता झोपला, जाग आल्यावर बघितलं तर बनला होता करोडपती

इतर क्राईम राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now