Share

चौकशी लागली की माणसं रिव्हर्स गिअर टाकतात; जयंत पाटलांच राज ठाकरेंना प्रत्युत्तर

raj thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क इथल्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. याचबरोबर राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे काय भुमिका घेतात याची एकच चर्चा सुरु होती.

शिवाजी पार्क इथे पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका करताना, राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. 1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं, अस राज ठाकरे यांनी म्हंटले.

पुढे राज ठाकरे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा जन्म होण्याआधी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले.  राज ठाकरे यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी अजून त्यांचं भाषण पाहिलं नाही आणि आता पाहणारही नाही. पण भाजपने अशा बऱ्याच बी टीम बाळगायला सुरुवात केलीय, असा आरोप पाटील यांनी केला.

ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘चौकशी लागली की माणसं रिव्हर्स गिअर टाकतात. त्यांचा रिव्हर्स गिअर मागेच पडलाय. विधानसभेत मनसेला कोणतंही स्थान नाही. राज्याच्या राजकारणातील महत्व उरलं नाही. त्यामुळे त्यांना फारसं महत्वं नाही, असे म्हणत पाटील यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.

दरम्यान, ‘स्वत:चं महत्व वाढवण्यासाठी शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपल्याला कोण विचारणार नाही, त्यांचं कुणी ऐकत नाही. त्यामुळे अशा विझत चाललेल्या लोकांबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
”चीनला आम्ही बघून घेऊ, रशियाच्या तेलावर अवलंबून असलेल्या पाश्चात्य देशांनी आम्हाला भाषण देऊ नये”
मोदींनी घातलेली भगवी टोपी झाली देशभर हिट, आता याच टोपीमध्ये दिसणार सगळे भाजप खासदार
रणबीर कपूरसोबत ‘या’ बॉलिवूड चित्रपटात झळकणार रश्मिका मंदाना, मेकर्सनी केली मोठी घोषणा
व्यासपीठावर शिव्या देतात अन् नंतर मांडीला मांडी लावून बसतात; राज ठाकरेंचा अजित पवारांसह फडणवीसांना टोला

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now