Share

jayant patil : शिंदेंनी पोटनिवडणूकीत ठाकरेंचा उमेदवार पळवल्यास…; पुढे काय होणार जयंत पाटलांनी स्पष्टच सांगीतलं

jayant patil

jayant patil on andheri election  | लवकरच अंधेरी पुर्वची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन गट या निवडणूकीत लढणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीही या निवडणूकीसाठी कामाला लागले आहे. राजकीय वर्तुळातही याबाबतची चर्चा सुरु आहे.

या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे मशाल हे चिन्ह असणार आहे. तर शिंदे गटाचे ढाल आणि तलवार हे चिन्ह असणार आहे. पण या निवडणूकीसाठी ठाकरे गटाने उमेदवारी दिलेल्या ऋतुजा लटके यांची अडचण वाढताना दिसून येत आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येताना दिसून येत आहे.

उमेदवारीचा अर्ज भरताना अडचणी येत असल्यामुळे ठाकरे गटाची आणि महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे ही योग्य बाब आहे का? भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेनेचा पक्ष फोडला. शिवसेनेतील बंडाळी ही भाजपने केलेली होती. आता अंधेरी निवडणूकीत ठाकरे गटाने दिलेली उमेदवारी भाजपकडून पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या ही मर्यादीत आहे. त्यामुळे तिथला निकाल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण आता ठाकरे गटाचा उमेदवारच पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून लढणाऱ्या ऋतुजा लटके यांना आपल्या गटात आणण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहे, असे म्हटले जात आहे. भाजपच्या मुरजी पटेल यांनी मतदार संघात प्रचार सुरु केला असला तरी शेवटच्या क्षणी ऋतुजा लटके शिंदे गटात येण्याची शक्यता धरुन सर्व पर्याय खुले ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Shivsena : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भर रस्त्यात फ्रिस्टाईल हाणामारी; मशाल रॅलीच्या स्वागतावरून झाला वाद
NCP : अंथरुणाला खिळून असतानाही १७ वर्षे पक्षसेवा करणारा राष्ट्रवादीचा योद्धा हरपला, शेवटी अजितदादांचा डिपी लावला अन्..
Eknath Shinde : धनुष्यबाण आम्हालाच मिळणार कारण निवडणूक आयोगाने हा निर्णय…; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now