Share

एलॉन मस्क यांच्या ‘त्या’ ट्विटला जयंत पाटील यांचे उत्तर; “आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून…”;

प्रसिद्ध ई-वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ने गेल्या काही महिन्यात जगभरात नाव कमावलं आहे. पण टेस्ला कार भारतात आणण्यासाठी शासकीय पातळीवर विविध आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने टेस्लाला भारतात येण्यास उशीर होणार असल्याचं ‘टेस्ला’चे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी सांगितलं.

भारतात आपली उत्पादने लॉन्च करण्याच्या कंपनीच्या योजनांबद्दल केलेल्या ट्विटला उत्तर देताना, मस्क यांनी, “सरकारी स्तरावर अजूनही अनेक आव्हाने आहेत,” असे म्हटले होते. टेस्ला भारतात येण्याआधी आयात शुल्कात कपात करण्याची मागणी करत आहे. त्याचबरोबर आयात शुल्कात सवलत देण्याबाबत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

तशातच आता टेस्लाचं उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्रात या, असं आमंत्रण महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत एलॉन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आमंत्रण दिले.

 

 

“महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात तुमची कंपनी स्थापन करण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमचा उत्‍पादन कारखाना महाराष्ट्रात स्थापित करण्‍यासाठी आमंत्रित करतो,” असे उत्तर जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.

दरम्यान, ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवर एकाने विचारला होता. त्यावेळी एलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला आणण्यासाठी काही शासकीय नियमांच्या समस्या उद्भवत असल्याचं लिहिलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करत त्यांना महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं.

महत्त्वाच्या बातम्या –
एअर होस्टेसवर फिदा झाला दारू तक्सर, तिला पटवण्यासाठी ५० वेळा बिझनेस क्लासने केला प्रवास
राकेश झुनझुनवालांसारखा पोर्टफोलिओ बनवायचाय? वाचा त्यांनीच सांगितलेला ‘हा’ सोपा फॉर्म्युला
तब्बल ६०० रुपये किलोने विकला जातो ‘हा’ टोमॅटो, वाचा कशी करायची त्याची शेती
तब्बल ६०० रुपये किलोने विकला जातो ‘हा’ टोमॅटो, वाचा कशी करायची त्याची शेती

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now