Share

वयाच्या ६ व्या वर्षी प्रवचनकार बनलेल्या जया किशोरीने आपल्या लग्नाबाबत पालकांसमोर ठेवली ‘ही’ अट

देशभरात भजन आणि कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या जया किशोरी(Jaya Kishori) वयाच्या 6 व्या वर्षापासून अध्यात्मिक जगाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच, भारतातील सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांना किशोरी जी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे खरे नाव जया शर्मा आहे.(jaya-kishori-who-has-been-associated-with-spirituality-since-the-age-of-6-has-placed-this-condition)

त्यांच्या कथा आणि भजनांचे लाखो चाहते आहेत, तर त्यांच्या लग्नाशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकांच्या मनातही प्रचंड उत्साह आहे. चला तर मग जाणून घेऊया की, जया किशोरी यांनी त्यांच्या लग्नाबाबत पालकांसमोर कोणती अट ठेवली आहे, जी जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

निवेदक जया किशोरी यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले की, ‘ती देखील सामान्य मुलगी आहे तर तिचेही लग्न होईल, परंतु तिचे लग्न कोलकातामध्ये(Kolkata), तिच्या निवासस्थानी झाले तर खूप चांगले होईल’ असे त्यांनी लग्नाबद्दल व्यक्त केले आहे. कोलकात्यातच लग्न करण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की त्याच शहरात लग्न करून त्या कधीही त्यांच्या माहेरच्या घरी येऊन जेवण करू शकतात.

पण जया किशोरी यांचे लग्न(Marraige) कोलकात्याच्या बाहेर कुठे झाले तर त्यांच्या पालकांनीही त्याच शहरात स्थायिक व्हावे, अशी त्यांची अट आहे. अशी अट ठेवण्यामागचे कारण म्हणजे लग्नानंतर त्यांना त्यांचे माहेरचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहावे लागेल आणि त्यांना आई-वडिलांपासून दूर राहायचे नाही.  जया किशोरी यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि एक बहीण आहे.

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now