बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांचा नुकताच 9 एप्रिल रोजी 74 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या खास दिवशी त्यांच्याविषयी अनेक चर्चा सुरू असताना जया बच्चन आणि शाहरुख खान यांच्यामधील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे.
एकदा जया बच्चन यांनी शाहरुख खानला कानशिलात मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या याच घटनेची चर्चा त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ती घटना नेमकी काय होती, आणि शाहरुख खानने असे काय केले ज्याने जया बच्चन चिडल्या होत्या याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तो किस्सा म्हणजे एका कार्यक्रमादरम्यान, एकदा शाहरुख खानने सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख छेडला होता. यामध्ये त्याने ऐश्वर्या रायचे नावही घेतले होते. या गोष्टीवर जया बच्चन प्रचंड चिडल्या होत्या. जेव्हा त्यांना शाहरुखने केलेल्या वक्तव्यावर नाराज आहे का विचारले तर यावर त्यांनी चिडून प्रतिक्रिया दिली.
म्हणाल्या, ‘नक्कीच मी नाराज आहे. मला शाहरुखसोबत याविषयी बोलण्याची संधी मिळाली नाही, पण भविष्यात मी याबाबत त्याला नक्कीच बोलेल. जर शाहरुख माझ्या घराचा व्यक्ती असता तर मी त्याला नक्कीच त्याच्या या चुकीबद्दल कानशिलात लावली असती. जसे मी मुलाशी वागते तशीच त्याने केलेल्या चुकांबद्दल वागली असते.’
जया बच्चन यांनी हे वक्तव्य केल्यानंतर बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आलं होतं. जया बच्चन यांचे घराणे बॉलिवूड मधील प्रतिष्ठित घराणे म्हणून ओळखले जाते. त्यातील प्रत्येक होणाऱ्या गोष्टींकडे सर्वांचेच लक्ष असते. छोट्यातील छोटी गोष्ट सर्वांसाठी बातमी बनून जाते.
शाहरूख खान बद्दल जया बच्चन यांची नाराजी एका बाजूला आहे, पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की शाहरुखचे बच्चन कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. तो अनेकदा त्याच्या घरी आयोजित पार्ट्या आणि गेट-टुगेदरला जातो. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांची नात आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील शाहरुखचा मुलगा अबरामचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.