शनिवारी (काल) देशभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. राज्यात दरवर्षी शिवजयंतीनिमित्त (19 फेब्रुवारी )रोजी उत्सवाचं वातावरण असतं. गावागावात महाराजांचे पोवाडे गायले जातात, व्याख्यानं ठेवली जातात. काल मध्यरात्रीपासून फटाक्यांची आतिषबाजी करून, पाळणा गाऊन महाराजांच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. प्रकाश आंबेडकर यांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तसेच बाबासाहेबांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचे चित्र होते, असे ते म्हणाले.
तसेच याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोकं हे एकमेकांना ‘जय भवानी’ असं अभिवादन करत असत.
https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1494952086894567429?s=20&t=7_z1b_9DeGLDVZl5Ff8XDA
याचबरोबर त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचं चित्र असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाच्यावेळी शिवाजी महाराज,महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. त्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या अनुयायांनी शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचा जयजयकार केला होता, असेही ते म्हणाले.
दरम्यान, याबाबत ज्येष्ठ साहित्यिक रमेश शिंदे यांनी म्हंटले आहे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या वेळच्या लेटरहेडवर ‘जय भवानी’ असे लिहिले होते. तशी पत्रेही माझ्याकडेही उपलब्ध आहेत; परंतु ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम बाबासाहेबांनी दिलेली नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
९ वर्षांनी भेटायला आला माजी विद्यार्थी, आधी टीचरला चाकूने भोकसले मग दागिने, कॅश घेऊन पळाला
IPL 2022: जगातील सगळ्यात अष्टपैलू खेळाडूला कोणीच का विकत घेतले नाही? पत्नीने केला मोठा खुलासा
गावचा गाडा हाकताना संसाराचा गाडा झाला सुरू; सरपंचासोबत उपसरपंच अडकले विवाहबंधनात, वाचा इंटरेस्टिंग स्टोरी
महेश मांजरेकरांना किस करण्यासापूर्वी अभिनेत्री म्हणाली, त्यांना सांगा आधी पाचवेळा हात धुवून या; वाचा काय आहे किस्सा