Share

ही सध्याच्या पिढीची चूक नाही तर आमच्या पिढीची चूक आहे, भाषेबद्दल जावेद अख्तर यांचे मोठे वक्तव्य

Javed Akhtar

राज्य सरकार आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या वतीने पुण्यात २० व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF- 22) चे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी चित्रपट, ओटीटी, मातृभाषा अशा अनेक विषयांवर आपले मत मांडले.

यावेळी बदलता चित्रपट याबाबत बोलताना जावेद अख्तर यांनी म्हटले की, ‘६० आणि ८० च्या दशकात चित्रपटातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता. पण ९० च्या दशकातील नायक मात्र कामगार वर्गातील नव्हता. त्याला देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. आता या गोष्टी बदलत आहेत. छोट्या गावांतील चित्रपट मोठ्या शहरातील लोक मल्टिफ्लेक्समध्ये पाहत आहेत’.

ओटीटी या विषयावर बोलताना अख्तर यांनी म्हटले की, ‘ओटीटी खूप सर्जनशील माध्यम आहे. या माध्यमाद्वारे अनेक विषय हाताळता येतात. असे काही विषय असतात जे दोन तासात दाखवता येऊ शकत नाहीत. तर त्यासाठी अनेक भाग गरजेचे असतात. त्यामुळे अशा विषयांसाठी ओटीटी हे प्रभावी माध्यम आहे’.

‘तसेच या माध्यमामुळे अनेक बोल्ड विषयांनाही हात घालता येते. त्यामध्ये अनेक प्रयोग करता येतात. याचा उपयोग प्रेक्षक आणि चित्रपट निर्माते या दोघांनाही होत आहे. निर्मात्यांना वेगवेगळे विषय हाताळता येत आहेत आणि प्रेक्षकांनाही विविध आशय पाहायला मिळत आहेत. आताच्या पिढीकडे मोबाईल सारखी साधने असल्याने ते या पिढीचे माध्यम आहेत’.

माध्यमातील भाषेबाबत बोलताना अख्तर यांनी म्हटले की, ‘ही सध्याच्या पिढीची चूक नाही तर आमच्या पिढीतील लोकांची आहे. आमच्या पिढीतील लोकांचे वेगळ्या गोष्टींना प्राधान्य होते. आम्ही भौतिक संपत्ती मिळवण्याच्या मागे होतो. या प्रक्रियेत आम्ही कला, संस्कृती, भाषा यांचं महत्त्व आमच्या पुढच्या पिढीला शिकवलंच नाही’.

यावेळी मातृभाषेबाबत बोलताना जावेद यांनी म्हटले की, ‘आज इंग्रजीशिवाय व्यवहार होत नाही. त्यामुळे इंग्रजी भाषा यायली हवी. पण त्यासोबतच प्रत्येकाला आपापली मातृभाषासुद्धा यायलाच हवी. कारण भाषेवरच संस्कृती तग घरून असते. भाषेपासून माणूस तुटला तर तो संस्कृतीपासून दुर होत जाईल. मातृभाषेशिवाय तुमचे अस्तित्व नाही. मातृभाषा येत नसेल, तर जमिनीशी तुमचे नाते संपते’.

महत्त्वाच्या बातम्या :
गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलिया नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रींना देखील देण्यात आली होती ऑफर
१६ वर्षांपूर्वीची परंपरा सोलापुरकरांनी राखली, नागराजचे असे काही स्वागत केले की तो ही झाला चकित
नागराज मंजुळेंमुळे बदललं ‘या’ २० वर्षीय मुलांचं आयुष्य, आभार मानत म्हणाला, कधी विचार केला नव्हता की..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now