Share

हिजाब वादावर आता जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलींच्या एका छोटाशा गटाला..

सध्या संपूर्ण देशात एक घटना खूप चर्चेत आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील आहे. हा वाद हिजाबबद्दल सुरू आहे. या वादावरून सध्या खूप मोठे राजकारण सुरू आहे. कर्नाटकातील उड्डपीमध्ये एका महाविद्यालयातील काही मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घातल्याने महाविद्यालयात प्रवेश दिला नाही. याच कारणांमुळे हा वाद सुरू झाला. या वादाचे पडसाद सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहेत.

या वादात अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूडच्या कलाकारांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, कंगना राणावत, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा अशा अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यामध्ये त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया सर्वांसमोर मांडली. जावेद अख्तर यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, ‘मी आतापर्यंत कधीच हिजाब किंवा बुरख्याच्या बाजूने नव्हतो. आज ही मी माझ्या मतावर ठाम आहे. परंतु मुलींच्या एका छोट्याशा गटाला घाबरून काय होणार आहे. या गुंडांच्या जमावाबद्दल माझ्या मनात फक्त तिरस्कार आहे. हा त्यांचा पुरुषार्थ आहे का? ’

 

 

अशा पद्धतीने जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच अनेक कलाकारांनी या सर्व प्रकारचा निषेध केला आहे. सर्वच क्षेत्रातून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर जावेद अख्तर यांनी अनेकवेळा राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

खरंतर हा संपूर्ण प्रकार जानेवारी महिन्यात घडला आहे. उड्डपी येथील एक महाविद्यालयात काही विद्यार्थिनीना हिजाब घालून वर्गात प्रवेश दिला नाही. मात्र त्यानंतर एक विद्यार्थिनीने याबद्दल निषेध करायला सुरुवात केली. आता हा सर्व प्रकार उच्च न्यायालयात गेला आहे. या मुलीने हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश मिळावा याची परवानगी देखील मागितली. याचाच एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तर महाविद्यालयात काही या मुलीच्या आजूबाजूला जमाव करून ‘जय श्री राम’ अशी घोषणा बाजी करायला सुरुवात केली. तर या मुलीने ‘अल्ला हो अकबर’ असे प्रत्युत्तर दिले. तसेच यासंदर्भात उच्च न्यायालयाने अजून कोणताही निर्णय दिला नाही.

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now