उमरान मलिकला (Umran Malik) टीम इंडियातील निवडीसोबतच आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चमकदार कामगिरीचे फळ मिळाले. उमरानची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात निवड झाली आहे. मलिक व्यतिरिक्त, आणखी एका खेळाडूची या आयपीएल सीजनमध्ये बरीच चर्चा झाली, तो दुसरा कोणी नसून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आहे.(Umran Malik, Team India, Dinesh Karthik, Shoaib Akhtar)
कार्तिकने आरसीबीसाठी फिनिशर म्हणून हनुमानाची भूमिका बजावली आणि संघाला विजय मिळवून देण्यात तो अनेक प्रसंगी यशस्वी झाला. दिनेश कार्तिकच्या कामगिरीमुळे त्याला ३ वर्षांनंतर टीम इंडियात पुन्हा प्रवेश मिळाला आहे. कार्तिक टी-२० सीरीजही खेळताना दिसणार आहे. दिनेशच्या सर्वोत्तम पुनरागमनाबद्दल जागतिक क्रिकेटमध्ये सतत चर्चा होत असते.
आता पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरनेही दिनेश कार्तिकवर भाष्य केले आहे आणि कार्तिकचे पुनरागमन ‘अविश्वसनीय’ असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अख्तर म्हणाला की, मी दिनेशची कारकीर्द खूप जवळून फॉलो केली आहे आणि वयाच्या ३६ व्या वर्षी तो ज्या प्रकारे संघात परतला आहे ते आश्चर्यकारक आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला की, मी सहसा लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतो. मला इथे सांगायचे आहे की, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याला मोठे धक्के बसले होते परंतु त्यानंतर त्याने खरोखर चांगले पुनरागमन केले, मी त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बरेच काही वाचले आहे आणि मला खरे तर त्याने पुनरागमन ‘अविश्वसनीय’ वाटले.
रावळपिंडी एक्सप्रेसने आपले म्हणणे मांडले आणि सांगितले की, ही खूप मोठी गोष्ट आहे, दिनेश कार्तिक माझ्या काळातील खेळाडू आहे. तो खरोखर तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहे. चांगल्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. तो ज्या प्रकारे भारतीय संघात परतला आहे ते पाहून आनंद झाला, माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.
या सीजनमध्ये कार्तिकने १५ डावात फलंदाजी करताना ३२४ धावा केल्या, पण त्याच्या डावातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने केलेल्या सर्व धावा संघाला सर्वात जास्त गरज असताना त्याने केल्या. दिनेश कार्तिकचे चाहते त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात.
महत्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकची पत्नी प्रेग्नेंट झाली पण मुल निघालं मुरली विजयचं, किस्सा वाचून अवाक व्हाल
तर राहुल द्रविड आणि रोहित शर्माने राजीनामा द्यावा, दिनेश कार्तिकसाठी चाहते मैदानात
डिव्हिलीअर्सने दिनेश कार्तिकला मिस्टर ३६० डिग्री म्हणून केले घोषित, म्हणाला, तो मला परत
दिनेश कार्तिकच्या त्सुनामीमध्ये वाहून गेला बांगलादेशी गोलंदाज, 6 चेंडूत केल्या 28 धावा