वनडे आणि टी २० क्रिकेटमध्ये इंग्लंडला यश मिळवून देणारा सलामीवीर जेसन रॉयने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या सिजनमधून माघार घेतली आहे. जेसन रॉयला गुजरात टायटन्सने २ कोटींना विकत घेतले. जेसनने गुजरात टायटन्सलाही आयपीएलमध्ये सहभागी न होण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे. (jason roy pull out from ipl)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसन रॉयने काही दिवसांपूर्वी गुजरात टीम मॅनेजमेंटला याबाबत माहिती दिली होती. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) जेसन रॉय क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रॉय दीर्घकाळापासून बायो-बबलमध्ये राहत होता, त्यामुळे त्याने लीगमधून आपले नाव काढून घेतले आहे.
२०२० मध्येही जेसन रॉय या लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने जेसन रॉय रोला १.५० कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय यापूर्वी गुजरात लायन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा भाग होता.
या लीगमध्ये त्याने आतापर्यंत केवळ १३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ३२९ धावा आहेत. गुजरात लायन्सकडून खेळताना रॉयने २०१७ या लीगमध्ये पदार्पण केले. जेसन रॉय ऑक्टोबरमध्ये होणार्या टी-२० विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगमध्येही जेसन रॉयने जबरदस्त खेळ दाखवला. क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना रॉयने ६ सामन्यात ३०३ धावा केल्या. त्याने ६ पैकी १ डावात एक शतक आणि २ अर्धशतक ठोकले. पहिल्या सामन्यात जेसन रॉयने लाहोर कलंदरविरुद्ध ११६ धावा केल्या होत्या. रॉयचे बाहेर पडणे गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा हा सिजन २६ मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. यावेळी १० संघ लीगमध्ये भाग घेणार आहे. या १० संघांची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पंजाबसह गुजरात टायटन्सचा ब गटात समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
पत्नीला प्रियकरासोबत पाहून भडकला पती; केले असे काही कृत्य की वाचून हादरल
पत्नीच्या ‘या’ सवयीला कंटाळून युवराज सिंगने उचलले होते टोकाचे पाऊल, केला होता तिचा नंबर डिलीट
पुण्यात ट्रेकिंग करताना लहान मुलांवर मधमाश्यांनी केला हल्ला, 19 मुली 2 मुलांची प्रकृती गंभीर