Jasmin dhunna shocking statement in interview | ८०-९० दशकातील काही सिनेमे असे आहे की ज्यांची चर्चा आजही होताना दिसते. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे वीराना. १९८८ मध्ये आलेला वीराना सिनेमा हा आजही अनेकांना पाहून भिती वाटते. हा सिनेमा त्या काळातही खुप गाजला होता. वीरानामध्ये काम करणारी जास्मिन धुन्ना या चित्रपटामुळे खुप फेमस झाली होती.
खुप प्रसिद्धी मिळूनही वीराना सिनेमाच तिचा अखेरचा सिनेमा ठरला होता. कारण हळूहळू तिला चित्रपटांमध्ये काम कमी मिळू लागले आणि काही काळानंतर ती पूर्णपणे गायब झाली. जास्मिन अजूनही मुंबईमध्येच राहते. जास्मिनने चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. ती तिच्या बोल्ड सीन्समुळेच खुप चर्चेत आली होती.
सिनेमात काम मिळण्यासाठी ती बोल्ड सीन्स द्यायलाही तयार झाली होती. तिच्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की ती क्रिप्टसाठी कॅमेऱ्यासमोर तिचे संपूर्ण कपडे काढू शकते. तिचे हे वक्तव्य तेव्हा खुप गाजलेही होते. पण त्याचा तिला काही फायदा झाला नाही. कारण तिला पुढे एकाही सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९८७ मध्ये एका मुलाखतीदरम्यान जास्मिन म्हणाली होती की, मला माझे कपडे काढायला किंवा किसिंग सीन द्यायला हरकत नाही. जर मुख्य अभिनेत्याने किंवा दिग्दर्शकाने मला तसे सांगितले तर मला कॅमेऱ्यासमोर कपडे काढायला तयार आहे.
तसेच पुढे ती म्हणाली होती की, जर मला राज कपूरसारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली, तर मी कॅमेऱ्यासमोरही माझे कपडे काढू शकते. जास्मिनने वयाच्या १३ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते, मात्र तिला लोकप्रियता फक्त ‘वीराना’मधूनच मिळाली.
असे म्हणतात अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम सुद्धा तिच्यावर फिदा होता. इतकंच नाही, दाऊद इब्राहिम तिला त्रासही देत होता. त्यामुळे वैतागलेल्या जास्मिनने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण तिला मदत मिळाली नाही. त्यामुळे ती अमेरिकेला गेली होती.