Share

Janvi kapoor bold photos: दिवसेंदिवस बोल्डनेसच्या मर्यादा पार करतीये जान्हवी, फिल्म रिलीज होताच केलं ‘असं’ फोटोशूट

सध्या जान्हवी कपूर (janvi kapoor) तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे, जो प्रेक्षकांना खुप आवडला आहे. या चित्रपटातील जान्हवी कपूरच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

त्याचबरोबर जान्हवीचे नावही त्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सामील आहे जे सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. ती रोज तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या क्रमात जान्हवीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते तिच्यावर लट्टू झाले आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवी लांब स्पॅगेटी मल्टी कलर ड्रेसमध्ये दिसत आहे. जान्हवीने एकामागून एक अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री जबरदस्त पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जान्हवीचे हेअरस्टाईल आणि न्यूड मेकअप तिला अधिक ग्लॅमरस बनवत आहे.

फोटोशूटचे फोटो शेअर करताना जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “#Jerry isn’t so blue anymore. जान्हवीच्या या पोस्टला कमी वेळातच 2 लाख 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

रकुल प्रीत सिंहने जान्हवीच्या पोस्टवर फायर इमोजी टाकून कमेंट केली आहे. त्याचवेळी एका सोशल मीडिया यूजरने या पोस्टवर ‘तुम्ही या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला आहे’, अशी कमेंट केली आहे. तर तिथे आणखी एका युजरने लिहिले आहे की, मस्त चित्रपट आहे.

विशेष म्हणजे, जान्हवी कपूर याआधी रुहीमध्ये राजकुमार रावसोबत दिसली होती, ज्याला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर तिचा ‘गुड लक जेरी’ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांनी या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या
‘महाराष्ट्रातील शिवसेना संपणार फक्त कमळ फुलणार’; जे. पी. नड्डांचे खळबळजनक विधान
आता पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार 1 दिवसात, लवकरच लागू होणार ‘हा’ नवीन नियम
Digpal lanjekar: ‘मी नकळत मोहनजींच्या पाया पडलो’, पावनखिंडच्या दिग्दर्शकाने सांगितला रेशीमबागेतील अनुभव
“संजय राऊत यांच्या नंतर आता शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता देखील जाणार तुरुंगात”

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now