देश सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या माजी सैनिकाचा राष्ट्रगीत सुरू असतानाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील सातपूर भागात घडल्याचं समोर येत आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (ex serviceman Died of a heart attack)
मौल्या हॉल पाठीमागचा संदीप नगर भागात ‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर यांना बोलवण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना अचानक सर्वांमध्ये उभे असलेल्या मालुंजकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर उपस्थित सर्व लोकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली.
मालुंजकर यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
८१ वर्षांच्या चंद्रभान मालुंजकर या माजी सैनिकाने १९६२ च्या युद्धात सहभाग घेतला होता. मालुंजकर यांनी देशासाठी केलेल्या कार्याचा सर्वांना आदर वाटतो. मात्र मालुंजकर यांना अशाप्रकारे मरण आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मालुंजकर यांना राष्ट्रगीत सुरू असताना अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने या घटनेविषयी राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. मालुंजकर हे भाजप संघटक म्हणून देखील नंतरच्या काळात कार्यरत होते.
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेने आमचा विश्वासघात केला, त्याचे परिणाम तो पक्ष भोगतोय… भाजपचा नितीश कुमारांना इशारा
मोदींकडे ना स्वतः च्या मालकीची गाडी, ना शेअर्स; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?
मलईदार खाते तर दूरच, साधे मंत्रीपदही मिळाले नाही; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी