मनसेला आणखी एक जबर धक्का बसला आहे. 1 मे रोजी पार पडलेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मशिदींवरील भोंगे काढण्यावरून केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करत बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. यामुळे सध्या मनसेत अस्थिरतेच वातावरण निर्माण झालं आहे.
सभेत राज यांचं भाषण सुरू असताना मशिदीतून अजानचा आवाज ऐकू येऊ लागला. ‘माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. हे जर सभेवेळी बांग सुरु करणार असतील, तर यांच्या तोंडात बोळा कोंबा. यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल, तर राज्यात काय होईल ते मला माहीत नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या याच व्यक्तव्यामुळे आता पक्षात नाराजी दिसून आली आहे. राज ठाकरेंच्या याच विधानावर नाराजी व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे पक्षाला आणखी एक जबर धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे.
याबाबत बोलताना जमीर सय्यद यांनी म्हंटले आहे की, ‘सभेत राज ठाकरे यांनी अजान सुरू असताना केलेले विधान मुस्लिम समाजाची भावना दुखावणारे आहे. समाजातील ज्येष्ठांसह सर्वांबरोबर चर्चा केल्यानंतर आणि समाजाकडून दबाव वाढल्याने राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.
ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. मिळालेल्या माहितीनुसार, जमीर सय्यद यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. मात्र पाटसकर यांनी जमीर सय्यद यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले आहे.
वाचा कोण आहेत जमीर सय्यद.. जमीर सय्यद हे मनसेत सलग १६ वर्षे सक्रिय आहेत. याचबरोबर ते दौंडचे मनसे शहराध्यक्ष देखील आहेत. तसेच जमीर सय्यद यांचे बंधू दहा वर्षे दौंड नगरपालिकेचे सदस्य होते. मात्र त्यांनी आता मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजप कार्यालयाबाहेर राज ठाकरेंची कार दिसल्याने राजकीय चर्चांना उधान; जाणून घ्या खरे कारण
राज ठाकरेंना पकडून कोर्टासमोर आणा; न्यायालयाचे मुंबई पोलिस आयुक्तांना स्पष्ट आदेश
ब्रेकिंग! शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी, अटक होण्याची शक्यता
माझ्या मनात आजही मोदींबद्दल प्रेम, मी त्यांचा आदर करतो; उद्धव ठाकरेंचे मोदीप्रेम अचानक का उफाळले?