Share

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील बाबासाहेब पुरंदरे वादात जेम्स लेनची उडी, केला मोठा खुलासा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. शरद पवार म्हणाले होते की, जेम्स लेनचे गलिच्छ लिखाण हे बाबासाहेब पुरंदरेंच्याच माहितीवर आधारित होते. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले असा आरोप केला. यावर आता चक्क लेखक जेम्स लेन याने खुलासा केला आहे.

ज्या पुस्तकातील लिखानाबद्दल वाद सुरू आहे, ते म्हणजे, ‘शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ होय. या पुस्तकाचे लेखक जेम्स लेन आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादावर लेन यांनी मोठा खुलासा केला आहे. यात स्वतः लेन यांनी पवारांनी केलेले सारे आरोप फेटाळले आहेत.

इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली. त्यात महाराष्ट्रात सुरू झालेल्या वादावर लेन यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. ‘शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाच्या लिखाणासाठी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा केली नव्हती, असा मोठा खुलासा या पुस्तकाचे वादग्रस्त लेखक जेम्स लेन यांनी केला आहे.

लेखक जेम्स लेन यांना इंडिया टुडेच्या वतीने प्रश्न विचारण्यात आला की, शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, या पुस्तकाच्या लिखाणासाठी आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मदत घेतली का? यावर जेम्स लेन म्हणाले, मला याबाबत कोणीही माहिती दिली नाही. माझे पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे.

या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय नरेटिव्ह सेट करून ठेवले आहे, त्याबद्दल आहे. काही लोक रामदासांना शिवरायांचे गुरू मानतात, तर काही तुकाराम महाराजांना. यातले काय खरे आहे, त्यात मला रस नाही. असे जेम्स लेन म्हणाले.

तसेच, माझ्या पुस्तकात मी कुठलेही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. मी पुन्हा सांगेन की, मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही, असे जेम्स म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती की, शरद पवार कधीच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत नाहीत. ते जातीपातीचे राजकारण करतात. त्यावर शरद पवार यांनी प्रतिउत्तर देताना म्हटले होते की, जेम्स लेननं जिजामातांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिले होते, त्यांचं कौतूक बाबासाहेब पुरंदरेंनी केले होते. असे म्हणत राज ठाकरे यांचे कान उपटले होते.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now