Jalna | ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाई करताना दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील जालना आणि औरंगाबाद येथे छापे टाकले. औरंगाबादमधील एका बिल्डरवर आणि जालन्यातील स्टील कंपनीच्या मालकावर हे छापे टाकण्यात आले.
या छाप्यात आयकर विभागाने 58 कोटी रुपये रोख आणि 32 किलो सोने जप्त केले आहे. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 13 तास लागले. छापेमारीत त्यांना फार्महाऊस आणि बँक लॉकरमधून ५८ कोटी रुपये मिळाल्याचे आयटी सूत्रांनी सांगितले.
फार्महाऊसमधून 28 कोटी रुपये तर बँक लॉकरमधून 30 कोटी रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. जप्त करण्यात आलेली रक्कम एका स्थानिक सावकाराच्या घरातून सापडली आहे. छापा टाकताना ही माहिती मिळाली आहे. श्री राम स्टील, कालिका स्टील, सहकारी बँक फायनान्सर विमल राज बोरा आणि डीलर प्रदीप बोरा यांच्यावर हे छापे टाकण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात बऱ्याच कंपन्यांच्या मालकांवर 3 ऑगस्ट रोजी छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाने एसआरजे पीटी स्टील्स प्रा. लि. आणि कालिका स्टील अलॉयज प्रा. लिमिटेड कंपन्यांवर छापे टाकले. या छाप्यात आयकर विभागाला 390 कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती मिळाली, जी जप्त करण्यात आली आहे.
जालन्यात आयकर विभागाच्या 260 अधिकाऱ्यांनी छापे टाकले. छाप्यादरम्यान ही कारवाई पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आली होती. याबाबत अधिकृत माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही. ही कारवाई 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान झाली. आयकर विभागाच्या नाशिक पथकाने ही कारवाई केली आहे.
आयकर विभागाचे 260 कर्मचारी, 120 वाहने आणि 5 पथकांनी संयुक्तपणे हा छापा टाकला आहे. या छाप्यात सापडलेली रोकड जालना स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता रोख मोजणी सुरू झाली ती दुपारी 1 वाजेपर्यंत चालली.
जालन्यातील 4 स्टील कंपन्यांच्या वर्तनात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. यानंतर विभागाने कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात घरामध्ये काहीही सापडले नाही, मात्र शहराबाहेरील एका फार्महाऊसमधून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
असे बोलले जात आहे की, 120 गाड्यांचा ताफा होता. या गाड्यांवर लग्नाचे स्टीकर्स लावण्यात आले होते. अधिकारी वऱ्हाडी म्हणून आले होते. लग्नासाठी आलेल्या गाड्या त्यांनी बुक केल्या होत्या. बऱ्याच गाड्यांवर दुल्हन हम ले जायेंगे असे स्टीकर्स होते. कोणालाही या छापेमारीची कुणकुण लागू नये म्हणून अशी शक्कल लढवण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना दिलासा, शिवसेनेची विरोधी पक्ष म्हणून निवड, ‘या’ बड्या नेत्याची विरोधी पक्षनेते म्हणून निवड
शिंदे गटाकडे वळणारी ३५ पदाधिकाऱ्यांची पावलं पुन्हा शिवसेनेकडे; वाचा काय आहे नेमकं प्रकरण
Chitra wagh : …तर मी राजीनामा द्यायला तयार, संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ यांचा भाजपला घरचा आहेर
महाविकास आघाडीत बिघाडी? शिवसेनेने ‘हा’ निर्णय परस्पर घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी