Share

shivsena : जळगावात तुफान राडा! बड्या नेत्याला अटक करायला आलेल्या पोलिसांना भिडले शिवसैनिक

shivsena workers

jalgaon shivsena workers and police  | जळगावात उद्धव ठाकरे यांच्या गटाची महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. त्या यात्रेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेना नेते शरद कोळी हे विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला होता. खालच्या शब्दात टीका केल्यामुळे शरद कोळींवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घातली आहे.

ज्या हॉटेलमध्ये शरद कोळी हे थांबले होते. त्या हॉटेलमध्ये पोलिस दाखल झाले होते. पण शरद कोळी यांनी त्या हॉटेलमधून पोलिसांना चकवा दे पळ काढला आहे. अशात शिवसैनिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिथे मोठा गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे सुषमा अंधारे पदाधिकाऱ्यांसोबत पायी पोलिस ठाण्यात पोहचल्या होत्या.

जळगावात महाप्रबोधन यात्रा शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात सुरु आहे. ठिकठिकाणी सुषमा अंधारे ठिकठिकाणी सभा घेत आहे. या सभेतून सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.

शरद कोळी त्यांच्या आक्रमक भाषणामुळे चांगलेच चर्चेत आहे. पण प्रक्षोभक भाषणामुळे ते अडचणीत सापडले आहे. त्यांच्या आक्षेपार्ह व्यक्तव्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या भाषणावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्याठिकाणी थांबले होते. त्याठिकाणी पोलिस नोटीस घेऊन दाखल झाले होते.

तसेच यावेळी पोलिस शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिक करताना दिसले. पण त्याठिकाणाहून शरद कोळी यांनी पळ काढला. ते एका अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. पण याच वेळी शिवसैनिक खुपच आक्रमक दिसले. शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली होती.

दरम्यान, सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पायी पोलिस ठाण्याकडे निघाले होते. त्यामुळे जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका करणे शरद कोळी यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
sanjay shirsat : शिंदेगटातील मेन मास्टरमाईंट पुन्हा शिवसेनेत येणार; बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात भूकंप
Pakistan : ‘वर्ल्कपमध्ये बड्या बड्या संघांना जे जमलं नाही, तो पराक्रम पाकिस्तानी संघाने करुन दाखवला’
Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now