Share

आव्हाडांचा जळगाव दौरा चर्चेत! काँग्रेसच्या आमदारासमोरच माजी नगरसेवकाने पक्षाला ठोकला रामराम, केला राष्ट्रवादीत प्रवेश

jitendra awhad

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. काँग्रेस काही नेत्यांच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील नाराजी नाट्याची आणखी एक बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यातील नेत्यांनी एकमेकांत पक्षांतर करु नये, असा अलिखित ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र ठाकरे सरकारमधील नेत्यांकडून या निर्णयाला हरताळ फासला जाताना दिसतो.

हे सांगायचं कारण म्हणजे सध्या आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे सरकारमधील नाराज स्थानिक नेते मोठ्या प्रमाणत पक्षांतर करत आहेत. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला. विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समोर हा प्रकार घडला आहे.

वाचा नेमकं काय घडलं? काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड जळगाव दौर्‍यावर गेले होते. या कार्यक्रमाला रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते. यावेळी चौधरींच्या समोरच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला.

जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे आपल्याच पक्षातील माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम दिल्याचे पाहून काँग्रेस आमदार चौधरी स्टेजवरुनच निघून गेले. सध्या या पक्षांतरची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारमधील नाराजीनाट्य काही थांबण्याच नाव घेत नाहीये. ‘आपल्या विधानसभा मतदार संघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही,’ अशी खंत जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केल आहे.तसेच या बाबत आपण सोनिया गांधी यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
..त्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्राने पंजाबकडे ७.५ कोटींची मागणी केली, भगवंत मान यांच्या आरोपाने खळबळ
ट्रॅफिकचे नवे नियम लागू; पहिल्या चुकीला 10 हजार दंड, दुसऱ्यावेळी गुन्हा तर तिसऱ्यावेळी होणार लायसन्स रद्द
कंगनासोबत काम करण्यास विवेक अग्निहोत्रींनी दिला साफ नकार, म्हणाले, मला स्टार्सची नाही तर…
‘या’ चार भावांनी मिळून श्रीलंकेची अर्थव्यवस्था डबघाईला आणली, नागरिकांचा आरोप

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now