high court : मांसाहार करावा की शाकाहार करावा, हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच कायद्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार करावा. याबाबत स्वातंत्र्य देखील देण्यात आले आहे. मात्र आहाराच्या संदर्भातील एका जनहितार्थ याचिकेची सध्या सबंध देशभर चर्चा आहे. टीव्हीवर, इतर माध्यमांवर मांसाहाराबाबत केली जाणारी जाहिरातबाजी बंद करावी, यासाठी जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली.
मांसाहाराबाबत ज्या प्रकारच्या जाहिराती माध्यमांतून दाखवल्या जात आहेत. त्यावर विशिष्ट नियम लागू करावेत. मार्गदर्शक तत्वे आखून द्यावीत. तसेच मांसाहार करणे शरीरासाठी अपायकारक आहे, असा संदेश जाहिराती दरम्यान खाली असावा, असे या जनहितार्थ याचिकेत म्हणले होते.
मात्र ही जनहितार्थ याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाने फटकारले आहे. ‘तुम्ही तर विशिष्ट गोष्टीवर बंदी आणण्यासाठी विशिष्ट नियम, मार्गदर्शक तत्त्वे तयार करा,’ अशी विनंती कोर्टाला करत आहात. नियम, कायदे करणे हे सरकारचे, विधिमंडळाचे काम आहे. न्यायालयाच्या अखत्यारीत ते बसत नाही. त्यामुळे ही जनाहितार्थ याचिका सदोष असल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले.
‘टिव्हीवरील जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा,’ असं म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली. त्यावर ही याचिका दाखल करणाऱ्यांच्या वकिलाने आम्ही ही याचिका मागे घेतो, परंतू पुन्हा नव्याने करण्याची मुभा देण्यात यावी, अशी विनंती केली. ती विनंती कोर्टाने मान्य केली आहे. आत्मकमल लुब्धेद्धेश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टच्या वतीने ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती.
भारतीय संविधानात व्यक्तीला त्याच्या खानपानाबाबत, धर्म पालनाबाबत आणि स्वतंत्रपणे व्यवसाय तसेच उदरनिर्वाह करण्याबाबत स्वातंत्र्य देण्यात आले आहे. कलम १४ ते ३२च्या दरम्यान हे मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने ही याचिका सदोष असल्याचे म्हणले असावे.
मात्र जैन धर्म पालनाच्या नियमानुसार जैन धर्मीय लोक शुद्ध शाकाहार करतात. मात्र इतर जे सर्व लोक मांसाहार करतात. तसेच मांसाहाराबाबत ज्या जाहिराती अनेक प्रसारमाध्यमांद्वारे करण्यात येत आहेत. यावर आता जैन ज्ञान मंदिराकडून आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल होणे, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Cyber: सावधान! अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावताय? काही मिनीटात बँक खाते होईल रिकामे
madhukar pichad : मधुकर पिचडांचा गड ढासळला; २८ वर्षांची सत्ता संपुष्टात, राष्ट्रवादीने दिला धोबीपछाड
Tanaji Sawant : तानाजी सावंतांसाठी चंद्रकांत पाटलांनी जोडले हात; वादग्रस्त विधानाबाबत म्हणाले…