भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे.
विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
ते म्हणतात, ‘भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटनं असा निडर संघ तयार केला की जो घरात आणि घराबाहेर कोणत्याही प्रतिस्पर्धीला टक्कर देण्याची धमक राखतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे मिळवलेले कसोटी विजय हे खास आहेत.’
दरम्यान, विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर बीसीसीआय प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे अभिनंदन करते, ज्याने आपल्या प्रशंसनीय नेतृत्व गुणांमुळे संघाला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्याने ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून ४० विजय मिळवले आणि तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.”
दरम्यान, कोहलीने ट्विट करून कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. तो गेल्याबरोबर पुढचा कर्णधार कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पदासाठी केएल राहुल, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अजिंक्य रहाणे ही चार नावे आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
तुझ्यात अनेक दोष आहेत, पण…; विराटच्या राजीनाम्यानंतर अनुष्काची धक्कादायक पोस्ट
‘या’ धक्कादायक कारणामुळे किरण मानेंना मालिकेतून काढले; वाहिनीने सांगितले वेगळेच सत्य
धक्कादायक! प्रसिद्ध कथ्थक सम्राट बिरजू महाराजांचे निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
पतीला द्यायचे होते सरप्राईज, झाली लाखो रुपयांची फसवणूक, पत्नीचा कारभार पाहून पतीही हैराण