प्रसिद्ध टीव्ही होस्ट जय भानुशाली (Jai Bhanushali) आणि त्याची पत्नी माही विज (Mahi Vij) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, यावेळी दोघेही एका खास कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, जे समजल्यानंतर दोघांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माही बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही शोमध्ये दिसली नाही, मात्र त्यानंतरही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(Jay Bhanushali, Mahi Vij, Remo D’Souza, Music Video)
दरम्यान माही आणि जय बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ही छोट्या पडद्यावरील हिट जोडी लवकरच पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज लवकरच टीव्ही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यावेळी जय आणि माही यांना प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनी संधी दिली आहे.
जय पत्नी माहीसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करताना दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. असेही बोलले जात आहे की, दोघे सध्या लंडनमध्ये गाण्याचे शूटिंग करत आहेत. विशेष म्हणजे, माही आणि जय हे पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम करणार आहेत. लग्नानंतर माही आणि जय पहिल्यांदाच टीव्हीवर रोमान्स करताना दिसणार आहेत.
माही विजने २०११ मध्ये जय भानुशालीसोबत लग्न केले. लग्नानंतर जय आणि माही कधीही कोणत्याही प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसले नाहीत. २०१९ मध्ये माही विजने आपली मुलगी ताराला जन्म दिला. लग्न आणि मुलीनंतरच माहीने टीव्हीपासून अंतर ठेवले होते. मात्र आता ते दोघेही म्युझिक व्हिडिओमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नुकतेच माही विजचे काही डिलीट केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या ट्विटमध्ये माही विजने आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा केला होता. माही विजचा स्वयंपाकी त्याला जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर माही विजने आपल्या स्वयंपाकीबाबत पोलिसांत तक्रार केली होती. काही काळापूर्वी माही विजच्या स्वयंपाक्याला पोलिसांनी अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय अभिनेत्यांना माहीतच नाही अभिनय काय असतो बॉलिवूड स्टार्सवर संतापला प्रॉड्युसर
रणबीर आणि आलियाच्या प्रेमकहाणीचं बालिका वधू कनेक्शन आले समोर, तुम्हाला माहीत आहे का हे सिक्रेट?
‘ठाकरे’ सिनेमाही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नाही, ‘द काश्मीर फाईल्स’ कुठे घेऊन बसलाय- संजय राऊत
पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, संभाजीनगरसाठी राजीनामाही देईन; मुनगंटीवार आक्रमक