प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (jacqueline fernandez) ७.२७ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. रिपोर्टनुसार, सुकेशने फसवणुकीच्या आधारे मिळवलेल्या पैशांचा फायदा घेण्याचा जॅकलीनवरही आरोप आहे. यादरम्यान एका माध्यमाच्या रिपोर्टनुसार जॅकलीनने ईडीसमोर ही कबूली दिली की, तिला सुकेशकडून अनेक गिफ्ट्स मिळाले आहेत.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार ईडीने जॅकलीनकडून जप्त केलेल्या संपत्तीमध्ये ७.२१ कोटी रूपये फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ठेवण्यात आले आहेत. तसेच सुकेशने जॅकलीनना ५.७१ कोटी रूपयांचे गिफ्ट दिले आहे. याशिवाय त्याने जॅकलीनच्या कुटुंबीयांनाही १ लाख ७३ हजार युएस डॉलर आणि २७ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरसुद्धा दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे जॅकलीनने ईडीला दिलेल्या उत्तराची कॉफी इंडिया टुडेच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर या रिपोर्टनुसार जॅकलीनने ईडीला सांगितले की, सुकेशने तिला अनेक गिफ्ट्स दिले आहेत. यामध्ये लिमिटेड एडिशन परफ्यूम, वेगवेगळ्या प्रदेशातील चॉकलेट, ब्रँडेड बॅग, ब्रेसलेट्स आणि डायमंडचे कानातले अशा वस्तूंचा समावेश होता. तसेच सुकेशने तिच्यासाठी प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरसुद्धा भाड्याने घेतला होता, असेही जॅकलीनने ईडीला सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
यावेळी सुकेशसोबत तिची भेट कशी झाली, याबाबत ईडीला सांगताना जॅकलीनने म्हटले की, ‘सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२०-जानेवारी २०२१ दरम्यान माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने दावा केला होता की, सुरुवातीला मी त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही’.
‘त्यानंतर मला सरकारी कार्यालयातील कोणीतरी संपर्क साधून शेखर रत्न वेला म्हणून ओळखत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात राहण्यास सांगितले. त्यामुळे मी सुकेशशी संपर्क साधला. तेव्हा सुकेशने स्वतःला सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबीयांचीही मला ओळख करून दिली होती’.
जॅकलीनने पुढे सांगितले की, ‘सुकेश जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून चेन्नईचा असल्याचेही सांगितला होता. तसेच तो माझा मोठा चाहता असल्याचेही म्हणायचा. त्यामुळे मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावे, अशीही इच्छा त्याने व्यक्त केली होती. यासाठी सन टीव्हीच्या माध्यमातून त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स असल्याचेही त्याने मला सांगितले होते. तेव्हापासून मी आणि सुकेश संपर्कात होतो’, असे जॅकलीनने ईडीला सांगितल्याचे रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले.
दरम्यान, ईडीने सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेकवेळा जॅकलीनची चौकशी केली आहे. परंतु, अद्याप तिला या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले नाही. असे असले तरी ईडीने तिला अद्याप क्लीन चीटही दिली नाही. तसेच तिला देश सोडून जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
सुकेश चंद्रशेखरवर आहे २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप –
दरम्यान, मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीने सुकेशसोबत त्याची पत्नी आणि इतर सहा जणांविरोधात ७ हजार पानांचा आरोपपत्र दाखल केला आहे. या आरोपपत्रानुसार सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, सुकेशने तिहार जेलमध्ये असणाऱ्या एका बिझनेसमॅनच्या पत्नीकडून अनेक पैसे उकळले आहेत.
रिपोर्टनुसार, सुकेश बिझनेसमॅनच्या पत्नीला पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय आणि कायदा मंत्रालयातील अधिकारी म्हणून फोन करत असत. तो बिझनेसमॅनच्या पत्नीला सांगत असत की, त्यांच्या पतीला जेलमधून जामीन मिळवून देणार आणि व्यवसायसुद्धा नीट चालणार.
जॅकलीनला दिले होते कोट्यवधींचे गिफ्टस –
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार सुकेशने जॅकलीनला कोट्यवधींचे गिफ्ट्स दिल्याचेही म्हणण्यात आले आहे. आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिनला मोठा बिझनेसमॅन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिला महागडे गिफ्ट्स दिले. यामध्ये ५२ लाख रूपयांचा एक घोडा, ९ लाख रूपयांचे मांजर यासह १० कोटींचे इतर वेगवेगळे गिफ्ट्सचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :
शाहरूख खान आणि हिरानींच्या ‘डंकी’च्या सेटवरचा पहिला फोटो आला समोर, असा असेल नजारा
‘अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल’
वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या महिला दिसतात परीपेक्षा सुंदर, स्टाईलमध्ये अभिनेत्रींनाही टाकतील मागे, पहा फोटो