बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफची एक दिलदार व्यक्ती म्हणून सोशल मिडीयावर ओळख आहे. त्याच्या या चांगूलपणामुळे जॅकीने चाहत्यांच्या मनावर कायम राज्य केले आहे. ते विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मिडियावर चर्चेत असतात. ते त्यांच्या हटके स्वभावामुळे ओळखले जातात.
याचबरोबर जॅकी श्रॉफ यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत देखील चांगले संबंध आहेत. नुकताच प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला राज ठाकरे, अभिनेता जॅकी श्रॉफ, ज्येष्ठ गायिका आशा भोसले दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमात जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याचबरोबर या कार्यक्रमात बोलताना अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या फिटनेसबद्दलचे रहस्य सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘कॅलरी कमी होत आहे का? हे बघण्यापेक्षा फॅट कमी होत आहे का? हे देखील पाहिलं पाहिजे. स्वत:च्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.’ असं देखील जॅकी यावेळी म्हणाले. याचबरोबर बोलताना यावेळी त्यांनी डॉक्टरांना देवाची उपमा दिली.
दरम्यान, पुढे बोलताना जॅकी श्रॉफ यांनी राज ठाकरेंबद्दल एक आठवण देखील सांगितली आहे. याबाबत सांगताना ते म्हणाले, “राज ठाकरे हे माझे फार जुने मित्र आहेत. त्यांनी मला पूर्वी एक गोष्ट सांगितली होती. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्हाला मराठीत बोलता आलं पाहिजे. मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही पण मी प्रयत्न करतो”, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पुढे आपल्या खास शैलीत बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले, “माझा मित्र (राज ठाकरे) आता आजोबा झाला आहे. तुम्ही सुरकुत्या असलेले लोक आजोबा झालेले पाहिले असतील पण राज ठाकरे हे ट्रेंड चेंजर आहे. राज ठाकरे अजूनही तरुण दिसतात”, असे जॅकी श्रॉफ यांनी म्हंटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कियाराच्या लग्नावर रिपोर्टरने केली ‘ही’ कमेंट, संतापलेला वरूण धवन म्हणाला, तुझे आई-बाप…
पुणेकरांनो! स्वारगेट हे नाव कसं पडलं माहिती आहे का? जाणून घ्या यामागची भन्नाट स्टोरी
एका दिवसात व्हायरल झालेला सोनू प्रसिद्धीला त्रासला; म्हणाला, मुलाखतींमुळे आणि मिडीयामुळे…
LPG सबसिडी: सरकारने गॅसवर जाहीर केली २०० रुपये सबसिडी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ