जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ 32 वर्षांचा झाला आहे. 2 मार्च 1990 रोजी मुंबईत जन्मलेला टायगर श्रॉफ त्याच्या चित्त्यासारखी चपळता, उत्कृष्ट नृत्य आणि फिटनेस यासाठी ओळखला जातो. त्याच्या डान्स आणि शानदार फिटनेसमुळे टायगर फक्त लहान मुलांचाच नाही तर वृद्धांचाही आवडता स्टार आहे. जॅकी श्रॉफने एका मुलाखतीत आपल्या मुलाचे नाव टायगर ठेवण्यामागचे कारण सांगितले होते. जाणून घ्या काय आहे त्याच्या नावामागील रंजक कथा.(Jackie Dada explained the interesting reason behind naming the boy Tiger)
मुलाखतीदरम्यान जॅकी श्रॉफने सांगितले होते टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे पण टायगर लहान असताना तो त्याच्या नखांनी माझा चेहरा ओरखडत असे. माझे डोळे खाण्याचा प्रयत्न करायचा. डोळे पाहिले की ही काहीतरी खाण्याची गोष्ट आहे असे त्याला वाटायचे. त्यामुळे तो त्यांना खाण्यासाठी धडपड करत असे.
जॅकी श्रॉफच्या म्हणण्यानुसार, तेव्हा त्यांचे वय सुमारे दोन वर्षे होते. त्याची कृती पाहून मला वाटले की त्याचे नाव टायगर ठेवावे, कारण तो चावतो आणि झडप मारतो. जॅकीने सांगितले की, जसे मी त्याचे नाव ठेवले आहे त्याचप्रमाणे तो आता वेगाने काम करून आपले नाव कमवत आहे. ते म्हणाले की, टायगर श्रॉफ बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमध्ये नाही, पण तो खूप मेहनत करत आहे. मी टायगरला 7 डिग्री तापमानातही डेडिकेशनने काम करताना पाहिले आहे, त्यामुळे मला खूप आनंद मिळतो.
टायगरने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर तो बॉलिवूड अभिनेता बनला नसता तर तो एक चांगला फूटबॉलर झाला असता. शालेय जीवनात टायगर सर्वात वेगाने धावत असे. टायगर श्रॉफ जेव्हा फिल्म इंडस्ट्रीत आला तेव्हा सगळे त्याला करीना कपूरच्या नावाने चिडवायचे. खरं तर, लोक म्हणाले की तो लेडी करीना कपूरसारखा वाटतो.
जॅकी श्रॉफने सांगितले होते की, टायगर लहानपणी खूप शांत होता. दिवसभर तो स्वतःमध्येच गुंतलेला असायचा. तो गप्प बसून राहायचा, आम्हाला कळायचे नाही की, तो काय विचार करत असायचा. आताही तो विचार करत राहतो. जास्त बोलत नाही, फक्त त्याचं काम करत राहतो. म्हणतो, पप्पा बोलून काय करणार? मी तुम्हाला काम करून दाखवतो, ते अधिक चांगले आहे.
जॅकी श्रॉफने पहिल्यांदा मुलगा टायगर श्रॉफसोबत ‘बागी 3’ या चित्रपटात काम केले. या अनुभवाविषयी बोलताना जॅकी म्हणाले की, पहिल्यांदा शूटिंग करताना मुलाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहणे ही वेगळी गोष्ट होती. मी पडद्यावरही त्याच्या वडिलांची भूमिका करत होतो. त्याच्या कामाच्या गांभीर्यात मी इतका हरवून जायचो की, मी तो सीन केव्हा शूट करायचो ते मलाच कळत नसायचे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, टायगर श्रॉफ लवकरच ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत तारा सुतारिया काम करत आहे. याशिवाय टायगर कृती सेननसोबत ‘गणपत’ हा चित्रपटही करत आहे. टायगर श्रॉफ नुकताच मौनी रॉयसोबत ‘पूरी गलबात’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता.
महत्वाच्या बातम्या-
फेसबूकवर विदेशी महिलेशी मैत्री करणं भोवलं, लागला ८ लाखांना चुना; पोलिसांनी असा लावला छडा
उन्हाळ्यात पाण्यातूनच कमवा पाण्यासारखा पैसा; असा करा मिनरल वॉटरचा बिझनेस, कमवा करोडो
चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच झुंडच्या टीमचा जबरदस्त डान्स; नागराज मंजुळे यांनी स्वत: वाजवली हलगी