उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray): देशातील सर्व पक्ष संपणार आहे, फक्त भाजप शिल्लक राहणार आहे. तसेच भाजपशी लढण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. त्यामुळे भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे.
“शिवसेनेला संपवण्याचे काम सुरु आहेत. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी अनेक आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे.” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईतील ‘मातोश्री’ येथे जळगाव येथील शिवसैनिकांशी संवाद साधत असताना ठाकरे बोलत होते. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होत आहे, असेही उद्धव ठकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
“आजपर्यंत अनेकवेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी पहिल्यांदाच बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजप अध्यक्षांनी बोलून दाखवलं. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे, असे म्हणत ठाकरेंनी जे. पी. नड्डा यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आपली लढाई ही दोन तीन पातळीवर सुरु आहे. एकतर रस्त्यावरची लढाई , त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी कायद्याची लढाई सुप्रीम कोर्टात सुरु आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. तिसरी लढाई तेवढीच महत्त्वाची आहे. ही लढाई मात्र कागदाची आहे. आपले वकील कोर्टात किल्ला लढवत आहेत. त्यामुळे ही लढाई आपण जिंकणार आहोत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. यात त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले. यानंतर शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीदेखील आम्ही अजून पक्ष सोडला नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागू होऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला.
महत्वाच्या बातम्या
Kanyakumari: कन्याकुमारी वरून काश्मीरला स्केटबोर्डवर निघाला होता तरूण; शेवटच्या टप्प्यात ट्रकने चिरडले
kangna ranaut: …म्हणून आमीर खानने स्वताच ‘हा’ वाद सुरू केला, कंगना राणावतचा आमिर खानवर गंभीर आरोप
Uday Samant: उदय सामंत हल्ल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंवरही पोलीस कारवाई करणार? शिंदे गटातील बड्या नेत्याचे संकेत
MNS: आता मनसेही मुख्यमंत्री शिंदेंविरोधात उतरली रणांगणात; म्हणाली, ‘शिंदे गटाचं अस्तित्व फक्त…