उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता कोणत्याही ट्रेडमधून आयटीआयचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईमधील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात ऑनलाइन प्रणाली पोर्टलचे उद्घाटन शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत असताना आयटीआय विद्यार्थ्यांसंदर्भात ही माहिती दिली आहे. उदय सामंत म्हणाले, पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या तीन फेऱ्या असणार आहेत.
पोलिटेक्निक प्रवेशाची एक फेरी गेल्यावर्षी करोनामुळे कमी करण्यात आली होती. यंदा मात्र एक फेरी वाढविण्यात येणार असून तंत्रशिक्षण विभागाकडून यासाठी नियोजन करण्यात येणार असे उदय सामंत म्हणाले. पोलटेक्निकमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण चांगली टेक्नॉंलॉजी देत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
त्यामुळे आता कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांस कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे उदय सामंत म्हणाले.
म्हणाले, दहावी निकाल जाहीर होण्याआधी १५ दिवस आपण पोलटेक्निक अभ्यासक्रमाचा फॉर्म भरणार आहोत. दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर या पोर्टलवर बोर्डाकडून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क अपलोड होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुन्हा कागदपत्र घेऊन फिरण्याचा त्रास कमी होणार आहे.
तसेच म्हणाले, मातृछत्र आणि पितृछत्र हरवालेल्या विद्यार्थ्यांना २६० पोलटेक्निक कॉलेजमध्ये २ जागा राखीव असणार आहेत. तसेच काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात शिक्षण घेण्याचा निर्णय अडीच वर्षांपुर्वीच महाराष्ट्र सरकारने घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमात संचालक डॉ अभय वाघ,सहसंचालकडॉ. प्रमोद नाईक , प्राचार्य, उपप्राचार्य आदी उपस्थित होते.