Share

Shinde group : गुवाहाटीहून सेनेत परतलेल्या आमदारानेच ठाकरेंना खाली खेचण्याची shinde group : घातली होती गळ; संदीपान भुमरेंचा गौप्यस्फोट

नुकताच अकोल्यात शिंदे गटाचा ‘हिंदू गर्वगर्जना’ मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. यावेळी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी बोलताना, शिवसेनेच्या एका आमदाराबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

शिंदे गटातर्फे आयोजित ‘हिंदू गर्वगर्जना मेळाव्या’ मध्ये राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि नेते अर्जुन खोतकर यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. तसेच भुमरे यांनी सुरतहून परतलेले अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्याबाबत एक खुलासा केला.

भुमरे म्हणाले, ठाण्याहून सुरतकडे जात असताना गाडीत एकनाथ शिंदे, मी, अब्दुल सत्तार आणि आमदार नितीन देशमुख होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खेचत तुम्ही स्वत: मुख्यमंत्री व्हा, अशी मागणी एकनाथ शिंदेंना केली होती, असे भुमरे म्हणाले.

नितीन देशमुख यांनीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याची गळ घातली होती, असे भुमरे म्हणाले. एवढेच नाही तर भुमरे म्हणाले की, देशमुख त्यावेळी म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांची खुर्ची पाडली गेलीच पाहिजे, मी देशमुख आहे, शब्द फिरवत नसतो.

‘एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही निर्णय घ्या, मी तुमच्यासोबत आहे. शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. कुठल्याही परिस्थितीत उद्धव साहेब यांना खुर्चीवरुन खेचायचं आहे,’ असे त्यावेळी नितीन देशमुख स्वतः च्या तोंडातून म्हणाले होते, असे भुमरे म्हणाले.

मात्र, हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना काय झालं. हे समजलं नाही, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, उद्धव ठाकरे आमदारांना काय कॅबिनेट मंत्र्यांनाही भेटत नव्हते. आम्हाला लाजेखातर ते भेटतात असं खोटं बोलावं लागत होतं, असे भुमरे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now