Share

प्रमोशनसाठी कपिल शर्माने नाही तर अनुपम खेर यांनी दिला होता नकार, स्वत:च केला खुलासा, म्हणाले..

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला ‘द काश्मीर फाइल्स‘साठी प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वी एका ट्विटमध्ये याचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की, चित्रपटात कोणताही मोठा स्टार नसल्याने त्यांना या शोमध्ये आमंत्रित करण्यात आले नाही.(it-was-not-kapil-sharma-but-anupam-kher-who-refused-the-promotion)

हे ट्विट समोर येताच कपिल शर्मा(Kapil Sharma) आणि त्याच्या शोवर लोकं संतापले होते. लोक त्याच्यावर आणि त्याच्या शोवर बहिष्कार घालण्याची मागणी करू लागले. सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले, मात्र आता सत्य समोर आले आहे. याची माहिती खुद्द कपिलने दिली आहे.

कपिल शर्माने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मुलाखतीचा आहे. यात अनुपम खेर(Anupam Kher) म्हणत आहेत की, ‘मी सत्य सांगेन. मला शोमध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मी माझ्या मॅनेजरला सांगितले की हा चित्रपट खूप गंभीर आहे. मी तिथे जाऊ शकत नाही. ही गोष्ट दोन महिन्यांपूर्वीची आहे. मला वाटले की मी त्या शोला 2-4 वेळा गेलो होतो. हा एक मजेदार शो आहे. मजेदार शो करणे कठीण आहे.’

https://www.instagram.com/p/CbF96GDAIlf/?utm_source=ig_embed&ig_rid=a8ebca38-8048-4cea-94c7-2e5c051c1d7c

हा व्हिडिओ शेअर करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्यावरील सर्व खोट्या आरोपांचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल अनुपम खेर यांचे आभार आणि त्या सर्व मित्रांचेही आभार ज्यांनी मला सत्य न कळता इतके प्रेम दिले. आनंदी रहा, हसत रहा.’

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी ट्विट केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर हा वाद आणखी वाढला. हे प्रकरण वाढत असताना कपिल शर्मानेही या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले होते. ट्विटरवर एका यूजरला उत्तर देताना त्याने लिहिले की, हे संपूर्ण सत्य नाही. ती एकतर्फी कथा आहे. मात्र, त्यानंतरही तो ट्रोल झाला.

कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून ‘द काश्मीर फाइल्स’मुळे सतत वादात सापडला आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर आणि त्याच्या ‘द कपिल शर्मा शो‘वर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. #BycottKapilSharmaShow ट्विटरवर खूप ट्रेंड झाला. कपिलला लोकांच्या रोषाला वाईटरित्या सामोरे जावे लागले.

‘द काश्मीर फाइल्स’ला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात खोऱ्यातील काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. हा सिनेमा 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now