Share

सोपं नव्हतं अनुपम खेर बननं; अभिनयासाठी केली चोरी, आईचा मार खाल्ला, अनेक रात्री काढल्या उपाशी

बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर गेल्या काही वर्षांत लाखो चाहते निर्माण केले आहेत. आजच्या पिढीतील अभिनेत्यांसोबत हा अभिनेता बहुतेकदा वडिलांची भूमिका साकारताना दिसतो.(it-was-not-easy-to-become-anupam-kher-stole-for-acting-mother-was-beaten)

अनुपम खेर सोशल मीडियावरही(Social media) खूप सक्रिय असतात आणि ते अनेकदा त्यांचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. त्यांनी स्वतःशी निगडीत एक किस्सा त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. वास्तविक, कॉलेजच्या दिवसांत त्यांनी आईचे 118 रुपये चोरले.

त्या दिवसांत ते पंजाब विद्यापीठात(Punjab University) शिकत होते. आधीच्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी खुलासा केला होता की ऑडिशनसाठी आई-वडिलांकडे पैसे मागण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी आईचे पैसे चोरले. चला जाणून घेवूया संपूर्ण किस्सा.

7 मार्च 1955 रोजी शिमला येथे जन्मलेल्या अनुपम खेर यांनी अभ्यासात फारसा रस घेतला नाही. आज आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अनुपम खेर लहानपणी लाजाळू होते. मात्र, अभ्यासाऐवजी त्यांना अभिनयाची खूप आवड होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून 3 वर्षे अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर या क्षेत्रात यश मिळवण्याचे स्वप्न घेऊन ते मुंबईत आले. पण इथे यश मिळणे सोपे कुठे होते?

अनुपम खैर यांनी स्वत: मीडियाशी बोलताना सांगितले की, मुंबईत आल्यावर महिनाभर रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले. खिशात पैसे नसल्याने अनेकवेळा उपाशीपोटी रात्र काढावी लागली. अनुपम खेर म्हणतात, ‘मी हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात प्रवेश घेतला. दरम्यान, मी इंडियन थिएटर, पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडची ॲड पाहिली, ज्यामध्ये वॉक-इन ऑडिशनसाठी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 200 रुपये शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासनही देण्यात आले. माझ्याकडे भाड्याचे पैसे नव्हते आणि माझ्या आई-वडिलांना हे विचारण्याचे धाडस माझ्यात नव्हते. म्हणून मी पैसे चोरले. माझ्या आईने हे पैसे मंदिरात ठेवले होते. ऑडिशन संपवून मी घरी परतलो तेव्हा माझ्या आई-वडिलांनी पोलिसांना बोलावल्याचे मला दिसले.

माझ्या आईने मला विचारले की मी येथून पैसे घेतले आहेत का, तेव्हा मी नकार दिला. पण, एका आठवड्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांनी मला विचारले की त्या दिवशी तू कुठे गेला होतास. तेव्हा मी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. हे ऐकून आईने मला एक थप्पड दिली. यावर माझे वडील म्हणाले काळजी करू नको त्याला 200 रुपयांची शिष्यवृत्ती मिळत आहे, त्यातून तो 100 रुपये परत करील आणि अशा रीतीने मला माझ्या प्रवेशाची माहिती मिळाली.

अनुपम खेर यांच्या डोक्यावर केस नसल्यामुळे त्यांना कोणीही चित्रपटात भूमिका द्यायला तयार नव्हते. अनुपम खेर यांना संधी हवी होती आणि वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना ती संधी मिळाली, जेव्हा त्यांचा पहिला चित्रपट ‘सारांश’ आला. जरी त्यांना ही भूमिका सहजासहजी मिळाली नाही. यावरून त्यांचा महेश भट्ट यांच्याशी वादही झाला होता.

वास्तविक, अनुपम खेर यांना सारांशासाठी फायनल करण्यात आले होते, मात्र त्यानंतर अचानक त्यांना या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा होती. अनुपम खेर (29) हे एका निवृत्त 70 वर्षीय अधिकाऱ्याची भूमिका साकारणार होते. महेश भट्ट यांनी या भूमिकेसाठी संजीव कुमारसारख्या मोठ्या अभिनेत्याची निवड केली होती.

जेव्हा अनुपम खेर यांना हे कळाले तेव्हा त्यांनी महेश भट्ट(Mahesh Bhatt) यांना खूप काही सुनावले. नंतर महेश भट्ट यांनी आपली चूक मान्य करत हे पात्र पुन्हा अनुपम खेर यांना दिले. अनुपम खेर यांनीही ही संधी हातातून जाऊ दिली नाही आणि याच चित्रपटातून सर्वांच्या नजरेसमोर आले.

यानंतर ते तेजाब, राम-लखन, परिंदा, चालबाज, सौदागर, डर, रिफ्यूजी, पहेली, ए वेनस्डे, जब तक है जान, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. अनुपमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे, ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यांच्याकडे सूरज बडजात्याची ‘उंचाई’ देखील आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, डॅनी डेन्झोंगपा, नीना गुप्ता, बोमन इराणी, सारिका आणि परिणीती चोप्रा देखील दिसणार आहेत.

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now