अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच रॉकिंग स्टार यशचा आगामी चित्रपट KGF Chapter 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात साऊथ कलाकारांसोबत हिंदी कलाकरांनी देखील काम केले आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने एक भितीदायक व्यक्तीरेखा साकारली असून त्यांच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडन चित्रपटात दिसणार आहे.
मुख्य म्हणजे संजय दत्त जी भूमिका साकारत आहेत ती काल्पनिक नसून सत्य कथेवर आधारित आहे. आज आम्ही तुम्हाला याच सत्य कथेविषयी सांगणार आहोत. वास्तविकतेमध्ये KGF म्हणजेच ‘कोलार गोल्ड फिल्ड्स’ची कथा थक्क करुन सोडणारी आहे. सांगण्यात येते की, खरच 121 वर्षांपूर्वी केजीएफमध्ये उत्खननादरम्यान 900 टन सोने सापडले होते.
ब्रिटिश सरकारचे लेफ्टनंट जॉन वॉरन यांनी याविषयी एक लेख लिहला होता. त्यामध्ये 1799 मध्ये श्रीरंगपट्टणाच्या लढाईत टिपू सुलतानचा वध करून कोलार आणि आजूबाजूचा परिसर ब्रिटिशांनी ताब्यात घेतला असल्याचे सांगितले होते. काही वर्षे उलटून गेल्यानंतर ब्रिटिशांनी ही जमीन म्हैसूर राज्याला देऊन टाकली.
परंतु कोलार हा सोन्याचा प्रदेश ब्रिटिशांकडेच राहिला. पुढे चोल साम्राज्याच्या काळात लोक हाताने जमीन उकरून सोने काढायला लागले. एकदा तर वॉरनने गावकऱ्यांना आमिष दाखवत सोने काढण्यासाठी भाग पाडले. परंतु यावेळी त्यांच्या हाती फक्त मातीत काही सोन्याने कण लागले. त्यामुळे त्यांनी काही तंत्रज्ञानाचा वापर करत पुन्हा उत्खनन करण्यास सुरुवात केली.
मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी अनेक मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेचे काही वर्षे उलटून गेल्यानंतर 1871 मध्ये ब्रिटीश सैनिक मायकेल फिट्झगेराल्ड लेवेलीनेला सोने शोधण्याचे प्रचंड वेड लागले. यासाठी त्याने 1873 मध्ये म्हैसूरच्या महाराजांकडून उत्खननासाठी परवानगी मिळवली.
1875 मध्ये मायकेलने उत्खनन करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक मजुरांना आपल्या हाताशी घेतले. या कामात सर्वांत जास्त जोखीम होती. कसल्याही सुविधा नसताना त्यांना हे सोने शोधून काढायचे होते. अनेक प्रयत्नानंतर त्यानी खाणीत वीज पुरवठा आणला. म्हटले जाते की, वीजपुरवठा सुरु झालेलं KGF हे भारतातील पहिलेच क्षेत्र होते.
KGF च्या खाणीतून सोने काढण्यासाठी 30 हजार कामगारांना बोलवण्यात आले होते. त्यांच्या मदतीने तब्बल 95 टक्के सोने बाहेर काढण्यात यश आले. मायकेलचा प्रयत्न यावेळी यशस्वी ठरला होता. आपल्याला सोने मिळत आहे हे पाहून तो पूर्ण वेडा झाला. तर या सोन्याला पाहून सर्वजनच आश्चर्यचकित झाले होते.
दरम्यान या सर्व घटनेवरच आधारित KGF चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता Chapter 2 चित्रपटही लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील थरारक सीन पाहूनच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. त्यामुळे वास्तवात हे किती भयानक असू शकते याचा अंदाज लावणेही अवघड आहे.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! ईडीच्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा झाली?
येडे चाळे! मगरीच्या पाठीवर बसून केला डान्स, पुढं घडलं असं काही की.., पहा थरारक व्हिडीओ
रणबीर-आलियाच्या लग्नात सहभागी होणार ‘हे’ सेलिब्रिटी; पाहुण्यांची यादी आली समोर
हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशन शीपमध्ये? विमानतळावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल






